संजय गांधी निराधार योजना
नमस्कार मित्रांनो दारिद्रयरेषेच्या खालील कुटुंबाच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या ६५ वर्षा वरील लाभार्थ्याला आर्थिक लाभ मिळू शकतो राज्य शासनाने पेन्शन मिळणाऱ्या वृद्ध व्यक्तीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .जसे मागील पेन्शन जर ६०० रुपये भेटत असेल तर त्यात वाढ होऊ शकते असे आज जाहीर करण्यात आले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याला २०२४ पर्यंत वाढ करण्यात येणार आहे. ज्याचे वय ६५ वर्षे वरील वय असेल तर त्यांना योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
संजय गांधी निराधार योजनेच्या निधीत वाढ होण्याची शक्यता
या योजने अंतर्गत ६५ वर्षांखालील निराधार ज्याला कोणी व्यवस्थित सांभाळ करत नाही व क्षयरोग,कर्करोग,एड्स,कुष्ठरोग आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्ती आपला उदरनिर्वाह भागवू शकत नाही अश्या पुरुष व महिला सांठी केंद्र सरकारने निराधार म्हणून घोषित केले आहे. सरकारने महिलांना पण या योजनेचा अधिकार दीला आहे.निराधार विधवा,घटस्पोट झालेल्या महिलांना पण योजनेत हक्क मिळणार आहे.तसेच अविवाहित स्त्री,तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या बायकोला या योजनेचा लाभ मिळू शकतो या योजने मध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे फायदे.
मित्रांनो ही योजना खरच एक निराधार व्यक्तीला म्हातारपणात जशी लाकडाची काठी त्या म्हाताऱ्याला आधार देते तशीच ही योजना म्हाताऱ्या व्यक्तीला म्हातारपणात शासनाकडून येणाऱ्या या ६०० ते ९०० रुपयाची निधीच काठी समजून साथ देते. महाराष्ट्रातील असे बरेच ५५ ते ७० वय असणाऱ्यांची संख्या आहे.खरच ज्या व्यक्तीने स्वत:ची संपत्ति मुलांना वाटून टाकली त्या बापाला सरकारच्या योजनेवर आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे . येणाऱ्या भविष्यात अजून गडद चित्र दिसण्याची भीती वाटत आहे.
या योजने साठी अर्ज कोठे करावा
या योजने संदर्भात अर्जदार जिल्हाधिकारी,तहसीलदार,तलाठी कार्यालय यासर्व ठिकाणी संजय गांधी योजने साठी तुम्ही अर्ज करून ही रक्कम मिळवू शकता व या योजनेस पात्र ठरू शकता.किंवा https://sjsa.maharashtra.gov.in