शेतकऱ्यांचे किडीपासून मोठे नुकसान
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्याने मराठवाडा, विदर्भातील सर्वच जिल्हयातील पेरणीचे कामे पूर्ण झाल्याने शेतकरी पिकातील अंतर मशागत कामात व्यस्त आहे.खरीप हंगामातील पिकाची वाढ ही
भरगोच होत असल्याने शेतकरी आनंदात आहेत. सध्या मात्र बऱ्याच ठिकाणी कापूस व सोयाबीन पिकाचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
पण मागील काही दिवसापासून सोयाबीन तसेच कापसाला कीड लागल्याचे सर्वत्र प्रादुर्भाव दिसून येत आहे.
गोगलगायचा सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव
मारठवड्यातील सर्वच जिल्हयातील शेतकऱ्यांची गोगल गाय समस्या बनत चालली असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लातूर,बीड, धाराशिव तसेच नांदेड या ठिकाणी गोगलगायचा सोयाबीन
वर सर्वात जास्त प्रादुर्भाव दिसून येत असल्याने सोयाबीन पिकाची येणाऱ्या दिवसात नासाडी होऊ शकते हे निश्चित मानले जात आहे. कारण मागील वर्षी याच महिन्यात गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे
सरकारने आर्थिक निधी शेतकऱ्यांना मंजूर केला होता.मराठवाडा तसेच विदर्भातील शेतकऱ्यांचे होणाऱ्या आर्थिक निधीसाठी तन मन धन हे राज्यातील कृषिमंत्र्या कडे लागले आहे.
ढब्बू पैसा कीड पासून कापूस पिकावर प्रादुर्भाव
ढब्बू पैसा कीड ही पावसाळ्यात निर्माण होणारी कीड असून पाऊस सुरू झाला निसर्गाचा अनोखा अंदाज पाहावयास मिळत असतो पन शेतकऱ्यांना याच ढब्बू कीड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस
पिकास हानी पोहचत आहे. हो मागील काही दिवसापासून विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस पीक लागवड केलेल्या शेत जमिनीत या पैसा कीड अळीने मोठे नुकसान करून टाकले असल्याने शेतकरी
या अळीच्या नायानासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत.अकोला,यवतमाळ,बीड,नांदेड तसेच वर्धा या जिल्ह्यातील पैसाकीड अळीच्या प्रादुर्भावाणे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचे चिन्ह दिसत आहे. या
किडीने ने पीक नेस्तनाबूत होऊन ते जागीच करपून जात आहे.
कापूस पिकास ढब्बू अळीचा प्रादुर्भाव
ढब्बू कीड आळी ही विविध नावांनी ओळखली जाते जसे की तेलंगी आळी,पैसा आळी, ढब्बू आळी, या आळी मुळे सोयाबीन व कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो.याकिडीची एक मंदी
पावसाळ्यात ओलसर जमिनीवर १०० ते ३०० अंडी जन्माला घालते या आळी पासून नुकसान टाळण्यासाठी केरोसीन पाण्यात टाकून नष्ट करू शकता व थायोडिकार्ब ७५ टक्के घटक लारविण
कीटक नाशक २५० ग्राम प्रती एकर मिसळून या किडीपासून मुक्तता मिळवू शकता.