शेंद्रिय शेती
नमस्कार मित्रांनो शेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध,खत,बीज,रोपे,तयार करणे व पारंपरिक पद्धतीने बियाणे वापरुन त्याला कोणतेही रासायनिक फवारणी व खत टाळून केलेली शेती म्हणजे शेंद्रिय शेती होय.
शेंद्रिय शेतीचे फायदे
शेंद्रिय शेती मनुष्याला संजीवनी सारखी उपयुक्त आहे जर आपण २०२३ मध्ये विचार केला तर भारतात प्रामुख्याने रासायनिक प्रक्रिया करूनच आधुनिक शेती केली जात आहे. सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून रासायनिक शेतीला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना शेंद्रिय शेती कडे वळवण्यासाठी विविध योजना राबवत आहे. शेंद्रिय शेती म्हणजे विषमुक्त शेती होय. शेती करतांना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील जमलेल्या कचऱ्या पासून तयार जसे की कुजलेले,शेण,कुजलेला झाडपाला,भुसा, गवत, सर्व पाला पाचोळा कुजवून तयार केलेला खत जसे की कोणत्याही रसायणिक प्रक्रिया न केलेला म्हणजे शेंद्रिय खत. जरी खताची मात्रा जमिनीला जास्त झाली तरी जमीन शोषून घेऊन पिकास पोषक सुपीक बनवते व याचा फायदा त्या पिकाला मिळतो पीक हे उत्तम दर्जेदार व खाण्यासही चविष्ट असते. भारतामध्ये आसाम एकमेव राज्य आहे तिथे फक्त शेंद्रिय बियानाचा व खताचा वापर केला जातो जर संपूर्ण भारतात अश्याच प्रकारे वापर केला तर भारत पूर्णपणे भारत विशमुक्त शेती होऊ शकतो. शेंद्रिय शेती पासून तयार केलेला भाजीपाला अव्वल दर्जाचा आरोग्यास पोषक समजला जातो. घाऊक बाजारपेठेत शेंद्रिय भाजीपल्याला अधिक मागणी आहे याच बरोबर जमिनीची गुणवत्ता टिकून राहते.
शेंद्रिय भारतीय भाजरपेठ
शेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या फळ भाज्या इतर कडधान्य यांची पंजारपेठ ही मोठ्या प्रमाणात आहे भारतात बऱ्याच शहरामध्ये शेंद्रिय फळ भज्याची मागणी आहे.साधारणतः मुंबई,पुणे,नाशिक,दिल्ली,बेंगलोर. कोलकत्ता,चेन्नई,चंडीगढ,डेहराडून,या सर्व ठिकाणी शेंद्रिय भाज्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात असल्याने याला मिळणार दर ही मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यास योग्य मोबदला या शेंद्रिय शेती मधून मिळत आहे.जर आपण केमिकल युक्त शेती चा असाच आमलबाजवणी केली तर येणाऱ्या पिढीस याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत केमिकल च्या औषधामुळे मानवाच्या शरीरामद्धे विविध प्रकारचे आजार तयार होत असल्याचे संशोधनामधून समोर आले आहे. फळभज्यावर ववेगवेगळ्या केल्या जाणाऱ्या फवारनीमुळे जमिनीची सुपीकता ही कमी होत जात आहे. जर या भारत मातेला जीवंत ठेवायच असेल तर ज्यासतीत ज्यास्त शेंद्रिय शेतीचा वापर करणे गरजेच आहे.