- वृक्ष लागवड अनुदान योजना
नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आज pocra योजने अंतर्गत राबवली जाणाऱ्या योजने विषयी माहिती जाणून घेणार आहोत नानाजी देशमुख यांच्या नावाने वृक्ष लागवड योजना महाराष्ट्र राज्य राबवत आहे .
जंगलाचे महत्व
मित्रांनो जंगलाचे महत्व सर्वांनाच माहीत आहे पण जगाच्या नकाशावर काही देश असे आहेत ते फक्त जंगलामुळे जगात ओळखले जातात जसे की ब्राझील या देशातील वनसंपत्ती ही त्या देशाची संपती आहे या देशातील अमेझॉन जंगल १२ माह वर्षा ऋतु असलेले वन आहे. याच वर्षा वणातून जगातील सर्वात मोठया नदीचा उगम होतो. याच नदीच्या पाण्याने ब्राझीलची कृषि अर्थव्यवस्था जोरात चालते ज्या मुळे येथील शेतकऱ्याला या नदीच्या पाण्यावर अधिक अधिक उत्पादन घेऊन आर्थिक समृद्धी साधता येते जर हे अमेझॉन चे वर्षा ऋतु वन ब्राझील ला लाभले नसते तर या देशाची कृषि अर्थव्यवस्था ही डगमगली असती.
वृक्ष लागवडीचे फायदे
वृक्ष लागवडीचे फायदे पाहणार आहोत जर पृथ्वी तळावर वन संपत्ति नसती तर ही पृथ्वी परग्रहा सारखी झीरो ऑक्सीजन बनली असती या झाडांमुळे समुद्रातील उडून गेलेले बाष्प हे ढगा मार्फत पुनः जमिनीवर पाण्याला द्रव रूपात परिवर्तन होऊन ते जमिनीवर येतात जर याच बाष्पाला या वनांच्या हवे चे प्रेशर त्या ढगाला लागले नसते तर जमिनीवर पाण्याचा साठा तयार झाला नसता म्हणून या घटकाचा विचार करून सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून प्रतेक गावा गावा मध्ये शेतकरी कुटुंबातील सर्व कुटुंबीयांना वृक्ष लागवडीचे फायदे सांगत आहेत.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थीस सर्वप्रथम गावातील ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय योजने अंतर्गत नाव नोंदणी करून ही योजना प्राप्त करू शकता वृक्ष लागवड करायचे असेल तर आपल्याला किती अनुदान मिळत ही देखील जाणून घेणे आवश्यक आहे . रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवड अनुदान योजना राबवण्यात येत आहे यामध्ये विविध जातीचे वृक्ष लागवड करू शकता लागवड करण्यासाठी शासनाकडून अनुदान एकरी २ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळेल या योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी www. pocra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन आपण अर्ज करू शकता .
या योजनेत भाग घेऊ शकणारे लाभार्थी
इंदिरा आवास योजने खालील लाभार्थी
स्त्रीकर्ता असलेली कुटुंब
जमीन सुधारणांचे लाभार्थी
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
दारिद्र रेषेखालील लाभार्थी
कुटुंबातील विकलांग असलेला लाभार्थी