विहीर पुनर्भरण योजना
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती मिळणार आहे . शेतकरी मित्रांनो तुम्हला जर या योजनेचा लाभ घेण्याचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
जमिनीत होणारी पाण्याची कमकरता (Lack of Water)
मित्रांनो मागील वर्षांमधील पर्जन्यमान हे कायमच लहरी पनाचे जाणवत आहे. निसर्गात होणाऱ्या बदला मुळे जलवायू समसेत दिवसेन दिवस भर पडत जात आहे. तसेच जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजल साठा हे पाण्याचे दोन्ही साठे प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत व पावसाळा चांगला असल्यास जमिनीवरील पाणीसाठी जसे की तलाव ,पाझर तलाव,धरणे, शेततळे ,ओढे विविध योजना मार्फत खोदुण ठेवलेली खड्डे , तलाव, इत्यादी तसेच यात पाणी शिरल्यामुळे भूजल साठ्यात वाढ होत आहे.
वाढती लोकसंख्या व औद्योगीकरण याचे परिणाम (Growing Population)
मित्रांनो जागतिक लोकसंख्या वाढ होत असताना , शहरीकरण, औद्योगीकरण, जमीन व पाण्याचे आरोग्य व्यवस्थापन, पिकाला पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, या सर्वचा विचार केला तर याचे गंभीर परिणाम या मनुष्य जातील भोगावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. पुनर्भरण यासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिक रित्या ही भूजल पुनर्भरण कमी होणे, दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा अनेक कारणांमुळे भूजल पातळी खोल गेलेली आहे ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे. त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही. त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात भुबर्ग अधिकाऱ्याचा अंदाज आहे. जर भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे अडवणे शक्य आहे, त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला पाहीजे नाहीतर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या पिढीस भोगावे लागणार आहेत. जे जमिनी वरती उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करून आपण या येणारी समसेला तोंड देऊ शकतो अन्यात: पाण्याची जशी राजस्थान मध्ये पानी प्रश्न पेटला आहे तसा पूर्ण देशात दिसू शकतो हे आपणाला विसरून चालणार नाही.म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भूजल पुनर्भरण योजना राबवत आहे.
पोकरांतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची – नियोजन (well Planning)
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सामाविष्ट करण्यात आलेल्या गाव व अल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे होणाऱ्या परस्तितीशी जुळवून घेणे व सक्षम बनवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.कृषी क्षेत्रात सिंचनासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरीचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे दुष्काळग्रस्त भागांमध्ये जास्तीचा पाणी साठा जतन करणे व लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे.प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भूजल पुनर्भर योजनेच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यामध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्य देऊन निवड करून लाभ देण्यात येतो.ज्या विहिरी बंद पडलेल्या आहेत. तसेच ज्यांची पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. अशा शेतकऱ्याची निवड करण्यात येत आहे.
या योजने साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Necessary Document)
१ ) ८-अ चा दाखला
२ ) ७/१२उतारा
३) फेरफार उतारा
या योजणेची अंमलबजावणीची व कार्यपद्धती (Implementation of The Scheme)
Maharashtra Project on Climate Resllient Agriculture
१ )इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.
२)व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करावा व या योजनेचा लाभ घ्यावा.
३ )आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहील.
४)निवडलेल्या लाभार्थींना त्यांच्या आवडीनुसार अनुभवी व्यक्ती किंवा संस्थेकडून सदरचे काम करण्याची मुभा असणार आहे.
5)उपविभागीय कृषी अधिकारी यांना ऑनलाइन पूर्व संमती दिल्यानंतर घटकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.
६ )ज्या विहिरी बंद पडलेल्या आहेत तसेच ज्यांची पाण्याची पातळी खोल गेलेली आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.
७ )या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.