भारत कृषी प्रधान देश म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जाते. देशातील बहुतांश शेतकरी हंगामानुसार पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी रासायनिक खतासोबत द्रव्य स्वरूपातील औषधांचे फवारणीचे प्रमाण ही वाढले आहे. खतामध्ये युरिया, डी.ए.पी, पोटॅश वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे.
खतांच्या किमतीत मागील काही वर्षा पासून सातत्याने होणारी वाढ शेतकऱ्यांना चिंतित करणारी ठरत आहे. एकीकडे जागतिक बाजापेठेतील खतांचे भाव नीचांकी पातळीवर असून ही भारतीय बाजार पेठेत खतांचे भाव दुपटीने वाढ होत आहे. खतांचा बऱ्याच राज्यात काळा बाजार होत राहिल्याने शेतकऱ्यांना येणं पेरणी मद्ये छापून दिलेल्या किमती पेक्षा जास्त पैसे मोजून खत विकात घ्यावे लागत आहे. केंद्र सरकारकडून रासायनिक खतावर ( NBS ) या योजने अंतर्गत देण्यात येणारी सबसिडी शेतकऱ्यांना लाभदायक ठरू शकते. पोषकद्रव्ये नुसार नायट्रोजन, फॉस्फेट,पोटॅश, सल्फर या ठराविक खतावर सबसिडी दिली जाते.
२०२३ खत किंमत
२०२३ या आर्थिक वर्षापासून सरकारने रासायनिक खताचे दर न वाढवण्याचे धोरण स्वीकारले होते पण सध्या ज्या किमतीला खत उपलब्ध आहेत त्याच किमतीला मिळेल का हे पाहावे लागेल.
भारतात सर्वत्र युरिया खताचा वापर प्रमुख खत म्हणून वापर केला जातो. २०२३ या वर्षी ४५ किलो युरिया गोनीला २४५ रु भाव होता तर या वर्षी या वर्षी २६६ रु भाव देण्यात आला आहे.
युरिया, डीएपी आणि पोटॅशचा दर
२०२३-२४ या चालू वर्षातील केंद्र सरकार द्वारे देण्यात येणाऱ्या सबसिडी (NBS) योजने मार्फत खताचे भाव
- यरिया प्रति बॅग ४५ किलो २६६ रु.
- डीएपी प्रति बॅग ५० किलो १३५० रु
- पोटॅश प्रति बॅग ५० किलो १७०० रु.
- NPK प्रति बॅग ५० किलो – १४७० रु.
वीणा अनुदान खताचा दर (अनुदानाशिवाय)
- युरिया प्रति पोती ४५ किलो २४५० रु.
- डी.ए.पी. पोती ५० किलो ४०७३ रु.
- पोटॅश प्रति प्रति बॅग ५० किलो – रु ३२९१.
- NPK प्रति बॅग २६५४ रु.
रासायनिक खतावर दिले जाणारे अनुदान
युरिया – २१८३ रु
डीएपी – २५०१रु
पोटॅश – ७५९ रु.
रासायनिक खतांचा प्रभाव कमी करण्यास प्रोत्साहन.
शेतकऱ्यांचा रासायनिक खतांचा कल वाढल्याने जमिनीचा प्रष्टभाग नापीक होऊन जमीन निर्जीव होऊ लागली आहे. याच बरोबर प्रदूषणाच्या समस्या जसे की जल, पर्यावरण, हवा यात सातत्याने हानिकारक द्रव मिसळत राहिल्याने पर्यावरणात लक्षणीय बदल झाला आहे.
केंद्र सरकारकडून रासायनिक खतांचा भार कमी करण्यासाठी अचूक पावले उचलण्यात आली पाहिजेत.