मुंबई सह कोकण विदर्भ मराठवाड्यात मान्सून ची जोरदार वाटचाल
नमस्कार मित्रांनो सुरवातीला वाट पाहायला लावणाऱ्या मोसमी वाऱ्यांनी दोन ते नि ते तीन दिवसांत वेगाने पावसाची वाटचाल सुरू आहे. दोनच दिवसात विक्रमी मान्सूनने प्रगती करत असल्याने महाराष्ट्रभर व्यापनार आहे. देशाच्या विविध भागामध्ये पावसाने हजेरी लावली असल्याने रविवारी मुंबई सह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या सरिचा पावसाने हजेरी लावली आहे.
पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि कर्नाटक ,आंध्र प्रदेश, पूर्वोत्तर राज्यात मॉन्सून दाखल होणार आहे. राज्यात विविध भागात वादळी वाऱ्यांसह मोसमी पावसाला सुरवात झाली आहे विदर्भातील अमरावती, चंद्रपूर , नागपूर, अकोला वर्धा येथे मेघगर्जेनेसह मोसमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मराठवाडा ,विदर्भातील अनेक ठिकाणी मोसमी पावसाचे अंगमन होण्याची शक्यताही देण्यात आली आहे. मोसमी वारे काही दिवसापासून शांत वाहत होते कारण बीपर जॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्र,गुजरात,कर्नाटक, राजस्थान, या ठिकाणी पावसाने जोरदार गर्जना करून पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केली होती व सारे बाष्प ही या चक्रीवादळा सोबत गेल्यामुळे मान्सून उशिराने केरळ मध्ये दाखल झाला जर हे वादळ आले नसते तर राज्यात पवसाचे अंगमन ही १० ते १२ दिवस अगोदर पाहायला मिळाले असते. पाऊस उशिरा आल्याने शेतकऱ्यांना मध्ये चिंतेचे पसरली होती जर पेरणी लवकर नाही झाली तर पीक उत्पादन कोणते घ्यावे या अडचनीला समोर जावे लागणार आहे. कारण मागील २ वर्षे पाऊस ही ७ ते १५ जून दारम्यान महाराष्ट्रात हजेरी लावत असत परंतु या वर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप पेरणीला उशीर होत आसल्याने शेतकाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण असल्याने या वर्षी पाऊस कमी असून त्यांचे अंगमन लांबले आहे. त्यामुळे खरीप हंगाम पेरणीचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जून संपत असल्याने कमी दिवसात येणाऱ्या पिकांची लागवड केली पाहिजे