Sindhudurg district ( सिंधुदुर्ग जिल्हा )

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडण्याचे ठिकाण आंबोली आहे. आंबोली म्हटल की लगेच सिंधुदुर्ग जिल्हा आठवणीत राहतो. समुद्र सपाटी पासून २०० फूट उंचीवर असणारा सिंधुदुर्ग हा जिल्हा कायमच पावसाचा गड मानला जातो.पूर्वेकडून अरबी समुद्र, दक्षिण कडून कर्नाटक व गोव्याची सीमा लागते तर उत्तरे कडून रत्नागिरी जिल्ह्याची सीमा प्रारंभ होते. सह्याद्रीच्या पर्वतामुळे पावसाचा जोर कायमच वाढता राहीला आहे.आंबोली घाटास महाराष्ट्रातील चेरापुंजी असेही म्हणण्यात येते ,दऱ्या, नदी,गजबजलेले जंगल श्रावण महिन्यात या जंगलाचे वेगळे रूप पहावयास मिळते.

Ratnagiri district  (रत्नागिरी जिल्हा )

रत्नागिरी हे शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्या लगत वसले असल्याने या जिल्ह्यास ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. कोकणातील सर्वाधिक पावसाची नोंद ही रत्नागिरी या शहरात केली जाते. हे शहर समुद्र सपाटी पासून ३५ फूट उंचीवर असून रत्नागिरी शहराला पूर्वेकडून सह्याद्रीच्या डोंगर कड्याने वेढले आहे. या शहराची सीमा कोल्हापूर, सातारा, रायगड शहराच्या सीमा लागतात तर पश्चिमेला अरबी समुद्र प्रारंभ होतो.

Kolhapur district (कोल्हापूर जिल्हा)

महाराष्ट्र राज्यातील हा एक ऐतिहासिक जिल्हा असून या शहरास राजकीय, आर्थिक, भौगोलिकदृष्ट्या, आधिक महत्व प्राप्त झाले आहे. कोल्हापूर जिल्हा समुद्र सपाटीपासून १७९० फूट उंचीवर असून सह्याद्री पठाराच्या सानिध्यात वसलेला पूर्वेकडील जील्हा आहे. या शहराचे हवामान पूर्वेकडील भागात कोरडे तर पश्चिम भागात थंड हवामान लाभले आहे.कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते.याचे करणं म्हणजे नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याने पावसाचे प्रमाण अधिक वाढते.

Raigad district (रायगड जिल्हा)

रायगड हा कोकण विभागातील महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा असुन रायगड हे नाव विश्वभर प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थान व महत्व पाहून १६ व्या शतकात रायगड महाराष्ट्राची राजधानी घोषित केली होती. सह्याद्री पर्वतांच्या उंच उंच डोंगर दऱ्यामध्ये असलेला हा जिल्हा १६ व्या शतकापासून ते आजतगायत पर्जन्यमानाचे महत्वाचे ठिकाण आहे. हे शहर समुद्र सपाटी पासून २७०० फूट उंचीवर आहे.

Pune district (पुणे जिल्हा)

भारतातील सर्वात मोठे आठव्या क्रमांकाचे शहर आहे. तर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर असून राज्याच्या आर्थिक व  औद्योगिक उद्योग निर्माण करण्याच्या हेतूने महत्वाचे शहर ठरते आहे. पुणे जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार पर्जन्यमान गतिशिल आहे. पुणे जिल्ह्याचा पश्चिमी भाग जंगल व सह्याद्री पर्वताने व्यापला असल्याने या जिल्ह्यास फायदा होतो.

पुणे शहर समुद्र सपाटी पासून १८७२ फूट उंचीवर आहे. जून महिन्यात अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यामुळे मान्सून पूर्ण महाराष्ट्र भर पसरतो त्यालाच आपण मान्सून वारे म्हणतो. पुण्याला सह्याद्रीच्या रांगा मुळे पावसाचे प्रमाण ही वाढलेले दिसते आहे. पुण्यामधील पावसाचा अंदाज प्रति वर्ष खरा ठरून पर्जन्यमान वार्षिक सरासरी ७२२ मिमी इतेका पाऊस पडतो.

Satara district (सातारा जिल्हा)

सातारा जिल्हा भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला असून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण काही तालुक्यात जास्त आहे तर काही तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा कमी असल्याने दुष्काळ ग्रस्त परिस्थिती निर्माण होते. पण वाई, महाबळेश्वर, पाचगणी, कृष्णा खोऱ्यात पावसाचे अंगमन दणक्यात होते. महाराष्ट्रात महाबळेश्वर हे ठिकाण थंड हवेचे आल्हादायक ठिकाण असून पावसाची ही विक्रमी नोंद होत राहते. सातारा जिल्ह्याची समुद्र सपाटी पासून उंची २४३३ फूट आहे तर वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *