उन्हाळा आला म्हटल की सर्वांना फळांचा राजा आंबा आकर्षक व लक्ष वेधून घेणारा ठरतो लहाण्यापासून ते मोठ्या पर्यंत सर्वांच्या नाकासमोर दरवळणारा सुगंध, मनातील कुतूहल वाढून खाण्यास उत्तेजित होणारा जिभांचा आनंद सर्वांना भुरळ पाडत राहतो म्हणूनच भारतात आंब्याला फळांचा राजा म्हणतात. भारतीय संस्कृतीमधील फळ महत्वाचा घटक आहे. कोणतेही कारण असो की नातेवाईक, घरगुती समारंभ, इतर पूजा,या प्रसाद म्हणून आंबा उपयोगात आणला जातो.

सनातन पौराणिक कथांमध्ये आंब्याचे झाड अनेकदा प्रेम, प्रजनन आणि समृद्धीशी संबंधित ओळखले जाते. आंबा सर्व प्रथम आम्रफळ करण्यास ओळखला जात असे. परंतू सुरुवातीच्या वैदिक साहित्यात याला रसाळ आणि सहकार असेही म्हटले गेले आहे. पौराणिक उपनिषद आणि पुराणातही या फळाचा उल्लेख मिळतो. दक्षिण भारतामध्ये अंब्यास ममके किंवा मंगा म्हणून ओळखले जाऊ लागले. तर उत्तर भारतात या फळास आम हे नाव पडले.

आंबा उगमस्थान (Mango origin)

आंबा हा भारतात फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. या फळाच्या प्रजातीचे मुळ नाव आंबा किंवा आमं या नावाने प्रसिद्ध आहे. हजारो वर्षापूर्वी या फळाला भारतीय उपखंडात आढळून आले असे काही जणांचे मत तर याचे मूळ उगमस्थान ही भारत आहे.

 आंब्याचा इतिहास ( History of Mango )

हजारो वर्षापूर्वी आंबा हा भारतीय उपखंडात पाय रोवून उभा राहून ज्याने पूर्ण जगभर प्रसिद्ध झाला. ज्या पद्धतीने भारतीय मसाल्याचा व्यापार अखा जगभर वाढत गेला अगदी त्याच पद्धतीने आंबा ही व्यापाराच्या माध्यमांतून जगभर पसरत गेला आफ्रिका खंड, अमेरिका, युरोप पर्यंत भारतीय आंबा प्रसिद्ध झाला.

आंबा खाण्याचे फायदे कोणते (What are the benefits of eating mango)

आंब्याचे खाण्याचे अनेक फायदे आहेत. ते उत्तम व्हिटॅमिन C स्रोत आहेत आणि आंब्या मद्ये असंख्य गुण आहेत, जसे की प्रतिरक्षण प्रणालीसाठी फायदेशीर असणे, असांगताची रक्त पुनर्स्थापने, आणि हार्ट हेल्थ सुधारणे.

अंब्या मद्ये कोणते जीवनसत्व असतात ( What vitamins are in mangoes)

आंब्या आणि त्याच्या रसातून आपल्या शरीराला खूप प्रकारचे जीवनसत्व मिळतात, जसे की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आणि अन्य कार्यक्षम अणु जैविक घटक. त्यामुळे तो त्वचेसाठी आणि सार्वजनिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर असतो.

भारतीय आंब्याची जागतिक ओळख (Global recognition of Indian mangoes)

आपणास सर्वांना माहीत असून की हजारो वर्षापासून आंब्याने आपल्या गोड सुगंध आणि चवीने लोकांना आनंदित केले आहे. हे फळ गोड आणि रसाळ आंबा खाण्यासाठी अनेक जण उन्हाळा येण्याची वाट पाहत असतात. भारतात हे फळ हजारो वर्षांहून अधिक काळ पिकवल जात आहे. परंतु काही देशांसाठी हे फळ त्यांच्याकडे ४०० वर्षापासून पिकवल जात आहे.

भारतात खाद्यपदार्थ आणि चालीरीतींमध्ये आंब्याला विशेष स्थान मिळाले आहे. मागील काही वर्षापासून आंब्याच्या विविध जाती विकसित या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक विकसित होणाऱ्या जात  त्याला स्वतःची चव लाभली आहे. जागतिक पटलावर भारत हा सर्वात मोठा आंबा उत्पादक आणि निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो आहे. जगात आंब्याच्या विविध देशांकडे १४०० पेक्षा जास्त जातीचे उत्पादन घेतले जाते. तर त्यापैकी एकट्या भारता मद्ये ९०० जातीचे उत्पादन घेतले जाते.

आंब्याच्या मुख्य प्रजाती कोणत्या (What are the main species of mango)

देशांतर्गत प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रजातीचे रक्षण केले गेले आहे. सुमारे ९०० हून अधिक प्रजाती लागवडी खाली आहेत. परंतू यामधील काही प्रजातीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्या जाती आपण पाहणार आहोत.

१)मालगीज आंबा २)रत्ना आंबा ३)हापूस आंबा ४)राजापुरी ५)पायरी आंबा ६)रायवळ आंबा ७)हत्ती आंबा ८)तोतापुरी ८)आंबालंगडा आंबा ९)सुवर्णरखा आंबा १०)शेंदऱ्या आंबा ११)शेपू आंबा १२)साखरगोटी आंबा १३)सिंधू आंबा १४)केसर आंबा १५)खोबऱ्या आंबा १६)चंद्रमा आंबा १७) नागीण आंबा.

आंब्याच्या दर किती

आंब्याचा दर फळाच्या गुणवत्तेवरून किंवा त्याच्या जाती वरून ठरवला जातो रायवळ व गावरान आंबा गोड असेल तर साधारणतः प्रति किलो ५० ते ६० रु किलो तर हापूस १३० रु किलो पायरी ७० रु प्रति किलो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *