गोड्या पाण्यातील मत्स्य पालन (POCRA)योजने अंतर्गत.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजने अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन योजना.मासा हा आहारातील मुख्य पदार्थ आहे. उपलब्ध पाणीसाठयात योग्य जातीचे मासे योग्य प्रमाणात सोडून त्याची जलद वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून कमी वेळात जास्त मशाची पैदास करण याला गोड्या पाण्यातील मासे म्हणतात.
गोड्या पाण्यातील विहीर व भातशेती मत्स्य पालन .
पाझर तलाव, गावतळी, भाडेतत्वावर घेऊन मत्स्य पालन करू शकता. व वैयक्तिक विहिरीत ही मत्स्य पालन करू शकता सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील युवकांचा मनात गोड्या पाण्याच्या विहिरीत मत्स्य पालंन पोषक समजले जात नाही पण आपण स्वतच्या गोड्या पाण्याच्या विहिरी मध्ये ही मत्स्य पालन करू शकता चांगल्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळत आहे.जे शेतकरी भात शेती करतात त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदारख ठरू शकते कारण भात शेती हे पाण्याच्या साठवणुकीवर अवलंबून असते जर भात शेतात पानी योग्य प्रमाणात असेल तर मत्स्य बीज भात सेतीच्या पाण्यात सोडून दर ३ माहीन्यानि भातपीका सोबत मत्स्य उत्पादन चांगल्या प्रमान्त होऊ शकते. भारतातील प. बंगाल, उत्तर प्रदेश. बिहार, या राज्यात भात शेती बरोबर यात कटला,रेहू,मृगळ या वनाचे पालन केले जाते.
गोडया पाण्याच्या तलावात जलद वाढ होणाऱ्या जाती व मत्स्य पालन नियोजन.
तलावातील गोड्या पाण्यात जलद वाढ होणाऱ्या व उत्पादन अधिक मिळणाऱ्या जाती कोणत्या त्या विषयी माहिती घेणार आहोत. प्रामुख्याने कटला, राहू, मृगळ, गवत्या,आणि सायप्रिन्स या मत्स्य ची पाण्यात लवकर वाढ होते या सर्व जातीचा एकमेकाला त्रास दायक नसल्याने या जाती एकाच पाण्यामध्ये वाढू शकतात. पणीसाठयांची मर्यादा बघून बोटकुली सोडावीत. जसे की कटला,राहू,आणि मृगळ या तीन जातींची बोटकुली ५ एकराच्या पणीसाठयात ४००० च्या दरम्यान सोडावी. जास्त बोटकुली सोडली तर अन्न कमी पडेल व मस्याची वाढ ही खुंटली जाऊ शकते. जर चांगले व्यवस्थापन ठेवल्यास १२ महिन्यात १ किलो वजणाचे मासे तयार होऊन ते बाजारात विकला जाऊ शकते.
मत्स्य पालन व्यवसायाचे फायदे
- भारतात मासे खाणाऱ्याचे प्रमानात वाढ होत असल्याने मास्याची डिमांड दिवसेन दिवस वाढत आहे. जर हे प्रमाण असच वाढत राहील तर सरकार या मत्स्य उत्पादनासाठी आमूलाग्र बदल करू शकते. विदर्भ मराठवाडा या १५ जिल्ह्यातील गावांना नानाजी कृषि देशमुख योजने अंतर्गत मत्स्य पालन योजने राबवत असल्याने याच फायदा शेततळेदर शेतकऱ्यांना होऊ शकतो.
- राज्य सरकार नानाजी देशमुख कृषि संजीवनी मत्स्य पालन पोकरा योजने अंतर्गत ६० टक्के अनुदान जाहीर केले आहे.
- यासाठी खर्च कमी व लाभ मिळण्याचे प्रमाण जास्त आहे.