जून महिना संपून ही पाऊस काही पडेना
नमस्कार मित्रांनो तुमच कृषि अड्डा मध्ये स्वागत आहे सध्या महाराष्ट्रासह देशातील विविध भागात पावसाचा जोर कायमच वाढतोय मुंबई सह राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली असल्याने.कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भात बऱ्याच ठिकाणी मान्सूनने जोर पकडला आहे.विदर्भ ,कोकण,पश्चिम महाराष्ट्रात पेरणीचे कामे ही जोरात चालू आहेत मुंबईत मागील दोन दिवसापासून पावसाने झोडपूड काडले आहे तसेच कोकण परिसर पण मोसमी वाऱ्यानि जोर पकडला असल्याने तेथेही जोराचा पाऊस चालू आहे. पण मराठवाड्यात पाऊस शेतकऱ्याला वाट पाहण्यास भाग पाडत आहे. मागील कांही दिवसापासून मराठवाड्याचे वातावरण ढगाळ असल्याने शेतकऱ्यांच्या मनात पाऊसा विषयी संभ्रमाची स्थिति निर्माण झाली आहे.मागील काही दिवसापासून मुबाई स ह 8 जिल्हयांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता पण मारठवड्यातील सर्वत्र जिलयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. भारतीय हवामान अंदाज हे पाऊस येईल असे सांगत आहे पण पाऊस पाडण्याचे चित्र काही दिसत नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत आहे.
भारत व्यापला मान्सूनने
सध्या मान्सून देशभरात सक्रिय असून त्याची आगेकूच सुरूच आहे. कोकण ,गोवा,मध्य भारत आणि ईशान्येकडील राज्यावर काळे काळे मोठ मोठे ढग दाटून आले आहेत. मध्य प्रेदेशत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो आत्ता भारताच्या उत्तर दिशेला सरकत चालला आहे याचा फायदा मध्य प्रदेशाला होऊ शकतो .जर असाच मान्सून मध्ये बदल होत असेल तर उत्तर भारतात तो लवकर दाखल होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. गुजरातमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे बऱ्याच जिल्ह्यातील वातावरण हे थंडगार झाल्याने नागरिकामध्ये आनंद आहे.
शेतकऱ्यांपूढे पेरणीची समस्या
शेतकऱ्यांपूढे पेरणीची समस्या येऊ लागली आहे शेतीचे सर्व कामे नांगरणी ,कुळवणे मशागतीचे कामे पूर्ण झाली असल्याने शेतकरी हा आता सदैव अभाळाकडे पावसाची वाट बगत बसला आहे. लातूर,धारशिव,सांभाजीनगर,जालना,नांदेड ,बीड ,जिल्हयांतिल काही ठिकाणी तुरळक पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली असल्याने येथील गावकऱ्यामध्ये पवसांअभावी पेरणी करण्याची वेळ येऊ लागली आहे. जर पावसाने असच दडी मारली तर शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.मागील काही दिवसापासून एल निनो चा प्रादुर्भाव सांगण्यात आला होता आत्ता बीपरजॉय मुळे पवसास विलंब होत आहे.