पीएम किसान योजना २०२३
पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojna) अंतर्गत भारत सरकार शेतकऱ्यांच्या अकाऊंट मध्ये दर वर्षी ६००० रुपये अर्थीक मदत म्हणून जाहीर करण्यात आली आहे. ही मदत सरकार कडून प्रतेक ४ महिन्यांला दोन हजाराचा हफ्ता शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या योजनेचे १३ हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना लाभार्थी
प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना २०२३ अंतर्गत लाभार्थ्याची यादी अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- सर्व प्रथम तुम्हाला pmkisan.gov.in वर जावे लागेल
- लाभार्थ्यानी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी .
- भेट दिल्यानंतर तुम्ही तुमचे नाव लिस्ट मध्ये तपासून घ्यावे .
- नाव असेल तर तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक भरावा लागेल.
- यादीत नाव असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो.
डबल धमाका बोनस ६ हजार भेटणार
पीएम किसान योजने मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक तीन हप्त्या मध्ये ६ हजार रु जमा केले जातात. व आत्ता केंद्रातील योजने सोबतच महाराष्ट्र सरकारने ही नमो किसान निधी योजना सुरूवात केली आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिक वार्षिक अनुदान मिळूवून देणार आहे पीएम किसान योजनेचे ६ हजार रु व महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त ६ हजार रु मिळून वार्षिक एकूण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.