नेपाळी टमाटर भारतीय बाजार पेठेत दाखला होणार.
भारताचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत नेपाळी टमाटे आयात करण्याची घोषणा केली आहे.
देशातील महागाई दर कमी करण्यासाठी टमाटे नेपाळ कडून आयात करण्यास मंजुरी मिळाली असल्याचे माहिती दिली आहे. त्यासाठी नेपाळी वाणिज्य मंत्र्यांनी ही या निर्यात विषयी होकार दिला आहे. देशात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने नेपाळी टमाटे भारतात आयात करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत असल्याने देशात टमाट्याच्या किमतीत सलग्न वाढ होऊन ती २०० रुपयांच्या वर फोहचली आहे.
काठमांडू, ललितपुर व भक्तपूर टमाटर केंद्र
नेपाळ देशातील या तीन प्रमुख जिल्यातील शेतीत टमाटर उत्पादन हे मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने येथील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय सुरू आहे.
राज्यात पुन्हा लाल चिखल होऊ शकतो.
नाशिक पुणे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये टमाटर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते कारण देशातील महागाई दर कमी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री यानी टमाटर आयातीचा प्रस्ताव संसदेत मांडल्या मुळे आयातीला त्वरीत मंजुरी मिळाल्याने राज्यातील टमाटर उत्पादन करणाऱ्या शेतकरयांना लाल चिखल होण्याची भीती वाटत आहे.
टमाटर भावात घासरन
मागील काही दिवसांपुर्वी २० कीलो च्या कॅरेट ला २२०० रु दर मिळत होता पण जसे निर्मला सीतारामन यानी संसेदेत टमाटर आयातीचा घोषणा केली तेंव्हा पासून टमाटर भावात घसरण होऊन आज पर्यंत त्याच टमाटर कॅरेट ला ८०० ते ९०० दर मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मनात हवला दीवल पैदा झाली असल्याने शेतकरी किती दराने टमाटर ची विक्री होईल का? याचा फायदा सरकारी चमचे घेतील हे पाहावे लागेल.
शेतकऱ्यांच्या टमाटर ला दलाला चे लक्ष.
जसे भाव घसरणार असल्याची चर्चा ला उधाण आले तसे देशातील नफा खोर दलाल नफा अधिक कमवण्याचे धोरण राबवत असतात या धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते.