नानाजी देशमुख फळबाग लागवड योजना POCRA SCHIME
फळबाग लागवड लाभार्थी पात्रता (Orchard Beneficiary Eligibility)
नानाजी देशमुख फळबाग लागवड या योजने मार्फत लागणारे कागदपत्र १) शेतकरी यांचे स्वत:चे नावे ७/१२ असणे गरजेचे आहे. जर ७/१२ वर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदाराचे फळबाग लागवड साठी संमती असणे आवश्यक आहे तरच तो लाभार्थी पात्र ठरेल २) ७/१२ उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे या योजनेसाठी संमती पत्र असणे आवश्यक असणार आहे. जर शेतकरी हा अल्पभूधारक व त्या कुटुंबाची उपजीविका हे केवळ शेतीवर असेल तर त्यांना या योजनेस प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकरी निवडला जाईल. ८ अ चा उतारा तसेच गावचे रहिवाशी प्रमाण पत्र लागू शकते.
अर्ज कुठे करावा (Where to Apply)
देशमुख फळ बाग लागवड करण्यासाठी अर्ज कुठे करावा https/dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज नोंदणी करून आवशक्य ते लागणारे कागद पत्र अपलोड करावी हे प्राप्त झाल्यानंतर कृषि अधिकाऱ्याने तांत्रिक दिल्यास शासकीय व खासगी रोपवाटिका यामधून कलमे रोपे खरेदी करून लागवड करून घ्यावी.
फळबाग लागवडीचे नियोजन (Orchard Planning )
प्रत्येक फळ झाडांसाठी समान क्षेत्रफळ मिळावे,एप्रिल मे माहीन्यात खड्डे खोदून कमीत कमी १० ते १२ दिवस उन्हात तपु द्यावे,कृषि विज्ञान अधिकाऱ्याकडून सखोल माहिती घेऊन त्याची लागवड करून घ्यावी लागवड झाल्या नंतर प्रत्येक २ दिवसांनी पाणी देण्यात यावे. फळं बागेतील अंतर मशागत झाडे छोटी असताना फळाच्या बुंद्यातील कचरा तसेच तन हे सर्व करून बाग नियोजन करून घ्यावे.फळ बागेची वाढ करण्यासाठी मोकळी जागा सोडली पाहिजे जेणे करून फळ झाडातील वाढ तसेच झाडात होणार विकास हा भरपूर होईल
फळ झाडतील नियोजन फळ झाडाच्या वाणांची लागवड(Orchard planning and the right choice)
करत असताना योग्य लागवड पद्धत निवडावी कारण याच गोष्टीवर फळ झाडाचे उत्पादन हे रोग किडीचा प्रादुर्भाव अवलंबून असतो. जर झाडाचे अंतर हे ज्यास्त जवळ झाली तर दोन झाडातील अंतर नियोजनानुसार जर ठेवले नाही तर यामध्ये अद्रता वाढते. अद्रता वाढल्याने याचे परिणाम झाडावर दिसू लागते झाड हे कमकुवत तसेच किड लागने झाडाची वाढ न होणे जर आपण डाळिंब बागेमध्ये शेतकरी हा डाळिंब वाणांची लागवड तर करतो पण ती लागवड जवळ जवळ असल्याने त्या झाडावर तेलकट डाग आणि मर लागल्याचे दिसून येते म्हणून या झाडाची लागवड करत असताना कृषि अधिकाऱ्याचा योग्य सल्ला घेतला पाहिजे जेने करून झाडाची योग्य वाढ होईल व शेतकऱ्याला सम प्रमाणात उत्पादन मिळेल.
नानाजी देशमुख लागवड व मिळणारे प्रती हेक्टर अनुदान (Goverment Grants to be Received)
आंबा कलमे (५x५मी) -१०२५०रु २) आवळा कलमे लागवड (७x७मी) -४९७३०रु ३)पेरू कलमे लागवड (३x२मी ) – २२०४०रु ४) संत्रा लागवड (६x३मी) प्रती हेक्टर अनुदान – ९९७२० ५) संत्रा मोसंबी व लिंबू लागवड (६x६) प्रती हेक्टर अनुदान – ५) ६२५७०रु ६)सीताफळ लागवड (५x५) ७२७९८रु ७)डाळिंब लागवड (५x३)१०९४८७रु प्रती हेक्टर अनुदान या सर फळ बाग लागवडीस मिळणारे अनुदान