नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना माहिती
नमस्कार शेतकरी बांधवानो मराठवाडा तसेच विदर्भ या दुष्काळग्रस्त भागतील गावामध्ये मंजरा व पूर्णा नदीच्या खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रातील गावामध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने ४ हजार कोटी अंदाजी खर्च नानाजी देशमुख या योजनेसाठी शासनाने जाहीर करून ही योजना राबवण्याची मान्यता दिली आहे.
पोकरा योजन माहिती व संदर्भ
मराठवाडा व विदर्भ या दुष्काळग्रस्त भागातील सर्वच १५ जिल्ह्यातील ५ हजार १४२ गावामध्ये २०१८ ते २०२४ या कालावधीत या योजना राबविण्यात येणार आहेत या योजनेस राज्यसरकारने मान्यताही दिली असल्याने या १५ जिल्ह्यांतिल सदा दुष्काळग्रस्त असणारी ४२०० गावी पूर्णा नदीच्या खोऱ्यातील पाणलोट पट्ट्यातील भूजल साक्षरतेची समस्या असलेली ९३२ गावी आशा एकूण ५२४२ गावांची या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने साठी निवड करण्यात आली आहे
नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पा विषयी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना
या योजणेसाठी खालील कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांना प्रकल्पाअंतर्गत सूचना प्रमाणे या प्रकल्प घटकाची अंमलबजावणी करावी.१)वृक्ष लागवड,२)फलबाग लागवड,३)हवामान अनुकुल तंत्रज्ञान शेती शाळा, ४)शेडणट हाऊस,५)पॉलि टनेल,६) पॉलि हाऊस/शेडनेट हाऊसमध्ये भाजीपाला, ७)परसातील कुक्कुटपालन,८ रेशीम उद्योग,९)मधुमक्षिका पालन,१०)गोड्या पाण्यातील मत्स्यपालन,११)गांडूळ खत उत्पादन युनिट,नांदेड कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय खत,१२) शेततळे,१३)शेततळे अस्तरीकरण,१४)ठिबक सिंचन,१५) तुषार सिंचन, १६)विहीर योजना,१७)विहीर पनर्भरण,१८) हवामान अनुकूल वाणाचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करणे,१९)रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान, मराठवाडा व विदर्भातिल शेतकऱ्यांना मागील काही वर्षापासून मोठ्याप्रमानात दुष्काळास समोर जावे लागत असल्याने महाराष्ट्र सरकारने कोरडवाहू शेतीस हातभार व शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नानाजी देशमुख संजीवनी योजना राबवली जात आहे. १५ जिल्ह्यातील ५२४२ गावांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे .
नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनासाठी खालील पोर्टलवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता
mahapocra.gov.in