शेततळे योजना पोकरा प्रकल्प अंतर्गत माहिती
नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यात राबवल्या जाणाऱ्या शेततळे योजनेला दिले जाणारेअनुदान या लेखात पाहणार आहोत. नानाजी देशमुख कृषि संजीवनी अंतर्गत महाराष्ट्र राज्यात शेततळे योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो व या योजने साठी अर्ज कोठे करावा हे आपण पाहणार आहोत.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी शेततळे योजना
राज्यातील कोरडवाहू शेतीची जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजने अंतर्गत शेततळ्यासाठी अनुदानाची योजना राज्य सरकारने सुरवात केली आहे. हवामान बदलांचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत असून भविष्यात देखील सदर परिणामाची व्याप्ती वाढणार असल्याने राज्या सरकारने हवामान बदला विषयी आराखडा तयार करण्यात आला असून तसेच हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना सक्षम करण्यास राज्य सरकार जागतिक बँकेच्या अर्थ साह्याने नानाजी देशेमुख कृषि संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या योजने मुळे शेकऱ्याच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्याचे जीवणामन उंचावण्यास मदत होईल.
या योजनेस आवश्यक लागणारी कागदपतत्रे
मित्रांनो आपण आज या लेखात नानाजी देशमुख कृषि प्रकल्प शेत तळे या योजनेचा आपल्या गरजू शेतकरी बांधवांना लाभ आपल्या शेतीस करून घ्यायचा,त्यासाठी या योजनेस अर्ज कुठे करायचा, लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतील हे पाहणार आहोत.
- ७/१२ व ८ अ चा उतरा.
- अर्जदार अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातील असल्याचा पुरावा.
- दिव्यांग असल्याचा त्याचा पुरावा.
(पोकर)योजने अंतर्गत पात्रता व निकष
१)प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठी ग्राम कृषि समितीने (VCRMC)मान्यता दिलेली अत्यल्प, अल्प भूधारक शेतकरी,अनुसूचित जाती /जमाती, महिला, दिव्यांग व इतेर शेतकरी या प्रकल्पास निवड करून लाभ देण्यात येईल.
२)निवडलेल्या आकारमानाच्या शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे
३)नैसर्गिक आपत्तिमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकरची हानी पोहचल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही.
४ )शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी लागले.
५)शेततळे पूर्ण करण्याकरिता आवश्यक यंत्रसमुग्रि उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी सबंधित लाभयार्थ्याची राहील .
६)या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुनः लाभ मिळणार नाही
७)नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत शेततळे योजनेसाठी अत्यल्प व अल्प भूधारक,शेतकरी, तसेच महिला असणे आवश्यक आहे.
अर्ज जमा व माहिती.
- सदर योजणेस लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.inया संकेत स्थळावर अर्ज भरून अवश्यक कागदपत्रे अपलोड करून लाभ घेऊ शकता.