तुषार सिंचन योजना
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प पोकरा योजनेत येते. पोकरा योजना अल्प भूधारक,कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली ज्यांच्या शेतीमध्ये पीक पाण्या अभावी मरून जाते त्या शेतकरी कुटुंबाला या स्कीमचा फायदा होऊ शकतो.या योजने मार्फत शेतकऱ्यांना अनुदान ही देण्यात येते. जेणे करून शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्तम योजना आहे. ही योजना गरजू शेतकऱ्यांना किफायतीशिर ठरणार आहे. पोकरा योजना ही मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यात राबवली जात आहे.
आवश्यक लागणारी कागदपत्रे
मित्रांनो आपण आज या लेखात नानाजी देशमुख कृषि प्रकल्प योजनेचा आपल्या गरजू शेतकरि बांधवांना लाभ आपल्या शेती करून घ्यायचा,त्यासाठी या योजनेस अर्ज कुठे करायचा, लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतील हे पाहणार आहोत.
- ७/१२ व ८ अ चा उतरा.
- अर्जदार अनुसूचित जाती /जमाती प्रवर्गातील असल्याचा पुरावा.
- दिव्यांग असल्याचा पुरावा.
- पानी व मृद तपासणी अहवाल.
या जिल्ह्यामध्ये राबवली जाते योजना
(POKRA YOJNA MAHARASTRA २०२३) जळगाव,अमरावती,बुलढाणा,लातूर,अकोला,जालना,वाशिम,धाराशिव,हिंगोली,बीड,वर्धा,नांदेड,यवतमाळ,परभणी या जिल्ह्यात राबवली जाते. या प्रकल्पामुळे १५६अधिक तालुक्यांचा समावेश करण्यात करण्यात आला असून या तालुक्यातील थेट ३७५० गावातील शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. मराठवाडा,विदर्भ या ठिकाणी सतत दुष्काळी परिस्थितीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत असल्याने राज्य सरकारने ही योजने थेट शेतकऱ्यांना तुषार सिंचन योजना पुरवण्यात येणार आहे.
तुषार सिंचनाचे फायदे
१)तुषार सिंचनाद्वारे पाण्याचा नाश होत नाही.
२)तुषार सिंचनाद्वारे पानी सर्व पिकास योग्य प्रमाणात मिळते.
३)पाण्याचा प्रवाह कमी असला तरी पाहिजे तेवढे पानी देता येते.
४)जमीन सपाट करण्याची गरज भासत नाही.
५)मजुरीवर खर्च कमी येतो व पीक उत्पादनात वाढ होते.
६)पावसा सारखे पिकावर पाण्याचा वर्षाव झाल्याने पिकावरची कीड ही कमी प्रमाणात लागते.
पात्रता आणि निकष
- मार्गदर्शक सुचनामध्ये नमूद केल्यानुसार साहित्य असणे आवश्यक आहे.
- विध्युत पंपासाठी कायम कायमस्वरूपी जोडणी आवश्यक असली पाहिजे.
- ज्या पिकाकरिता तुषार संच बसविण्यात येणार आहे त्या पिकाची नोंद ७/१२ वर असणे आवश्यक आहे.
- सिंचन घटकाचे साहित्य बी.एस.आय. गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे.
- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अत्यल्प व अल्प भूधारक,शेतकरी, तसेच महिला असणे आवश्यक आहे.
- सदर योजणेस लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.inया संकेत स्थळावर अर्ज भरून अवश्यक कागदपत्रे अपलोड करून लाभ घ्यावा