Dr. Babasaheb Ambedkar Krushi swavlamban Yojna.
देशातील गरीब आर्थिक संकटात सापडलेल्या अनुसूचित जाती नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे,समृद्ध जीवनमान सुधारणे व अनुसूचित जातीसाठी उपाय योजना करने हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन कृषी योजना राबविण्यास शासनाने २७ एप्रिल २०१६ रोजी मान्यता देण्यात आली.
मित्रांनो शेती करण्यासाठी पाणी व्यवस्थापन करणे एक महत्वाचा भाग असतो.पण अल्प भूधारक, गरीब,नवबौध्द आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना कोणीही आर्थिक मदत करत नसल्याने राज्य शासनाच्या गोष्ट लक्षात आल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन कृषी योजना च्या अनुषंगाने अश्या गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे.
योजनेचे उद्दीष्ट
- नवीन विहीर बांधण्यासाठी :- २,५०,००० दोन लाख पन्नास हजार रु.
- जुनी विहीर दुरुस्ती :- ५०,००० पन्नास हजार रु .
- इनवेल बोअरींगसाठी :- २०,००० वीस हजार रु.
- पंप संच :- २०,००० वीस हजार रु.
- वीज जोडणी :- २०,००० वीस हजार रु.
- शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण :- १०,०००० एक लाख रु.
- ठिबक सिंचन :- ५०,००० पन्नास हजार रुपये.
- पीव्हीसी पाईप :- ३०,००० तीस हजार रु.
- परसबाग:- ५०० पाचशे रु.
Babasaheb Ambedkar Krushi swavlamban Yojna.आवश्यक कागद पत्र
- लाभार्थी अनुसूचित जातीचा असला पाहिजे.
- लाभार्थी जातीचा वैद्य दाखला बंधनकारक आहे.
- जमीनीचा ७/१२ आणि ८ अ चा उतारा असणे महत्वाचे आहे.
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.
- अर्जदार शेतकऱ्यांचे उत्पादन दीड लाख रुपयांच्या आत असायला हवे
- उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे
- लाभार्थ्यांची जमिनी किमान ० .४० हेक्टर बंधन कारक आहे.
- नवीन विहिरी साठी कमीत कमी ६ हेक्टर असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांचे बँक खाते व बँक खात्याला आधारकार्ड सलग्न असणे आवश्यक आहे.
- बिपिल यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची गरज नाही.
आवश्यक कागदपत्र
- शेतीचा ७/१२ उतारा.
- शेतीचा ८ अ नमुना.
- अर्जदारच्या नावाने असलेला बँक पासबुक.
- जातीचा दाखला.
- उत्पन्नाचा दाखला.
- स्वतःच्या सहिने भरलेला अर्ज प्रत
- https://mahadbt.maharashtra.gov.i
७ नंबरच्या तक्त्या मधील लिंक वर जाऊन अर्ज भरू शकता.
Babasaheb Ambedkar Krushi swavlamban yojna.
पाणी प्रश्न हा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. वातावरणातील बदलाचे गंभीर परिणाम भूभर्गीय जलाशयावर होत आहे.दिवसेन दिवस मोठ्या प्रमाणात भूभर्गीय जलाशयाचा उपसा ही एक चिंतेची बाब ठरू शकते. अधिकाधिक पाणी उपसा केल्याने पाण्याची पातळीत घट होत चालली आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून या विविध माध्यमाच्या माध्यमातून प्राप्त करून प्रदर्शित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्या विषयाच्या क्षेत्रातील जाणकार तज्ञांचा सल्ला घ्यावा ही माहिती सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित केली जात आहे. इतर कोणत्याही नुकसानीस लेख अथवा लेखक या वेबसाईट जबाबदार राहणार नाही.