प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना २०२३
नमस्कार मित्रांनो कृषि अड्डा मध्ये आज आपण प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना विषयी माहिती घेणार अहोत.राज्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यांकडे पानी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने पाण्याचा योग्य वापर शेतीस करण्यासाठी प्रधानमंत्री कृषि सूक्ष्म सिंचन योजना लागू करण्यात अली आहे.सूक्ष्म सिंचन ही एक प्रगत सिंचन प्रणाली आहे.
ज्याद्वारे रोपांच्या मूळ क्षेत्राला विशेषत:बनवलेल्या प्लॅस्टिक पाइप द्वारे कमी अंतराने पानी पुरवठा केला जातो.
ठिबक सिंचन प्रणालीचे फायदे.
या प्रणाली द्वारे ठिबक सिंचन पद्धत,तुषार सिंचन पद्धत, आणि रेण गण सिंचन पद्धत वापरली जाते. या प्रणाली अंतर्गत
पिकाला पान दिले असतां लागणाऱ्या पाण्या पैकी ३० ते ४० टक्के पानी कमी लागते व सिंचन पद्धतीमुळे पिकाची
उत्पादकता ४० ते ५० टक्के वाढते. ठिबक सिंचन प्रणाली मुळे शेतातील तण कमी हे ५० ते ६० टक्के कमी होऊन
शेतकऱ्यांना तणनाशक औषधी व मेहनतीचे पैसे कमी लागतात.
प्रधान मंत्री कृषि योजना केंव्हा सुरुवात केली.
सन २०१५-१६ मध्ये भारत सरकारने ग्रामीण सिंचन व्यवस्थेला चालना देण्यासाठी संपूर्ण भारतभर या योजनेची
अंमलबजाणी केली असल्याने. या योजने अंतर्गत महाराष्ट्रात एकूण क्षेत्रापैकी पैकी ७ टक्के क्षेत्रात हे ठिबक सिंचन
योजने अंतर्गत केली जात आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी नगदी पिके घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला आहे.ज्यामध्ये भाजीपाला, फळबाग, आणि फळांचे उत्पादन या सिंचन प्रणाली द्वारे वाढले आहे.
ठिबक सिंचन योजने मुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना.
प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना सर्वसामान्य अल्प भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन देशातील सर्व कृषि क्षेत्राला सिंचनाची
उपलब्धता करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व प्रती थेंब अधिक पीक उत्पादन घेता येईल आणि
अपेक्षित ग्रामीण आर्थिक समृद्धी करण्यात मोलाचे स्थान प्राप्त होईल.
ठिबक योजनेची पात्रता
- शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असावे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ७/१२ दाखला आणि ८ अ प्रमाण पत्र असावे.
- शेतकरी हा एससी,एसटी असेल तर जातीचा दाखला आवश्यक आहे.
- ज्या लाभार्थ्याने २०१६ ते १७ च्या अगोदर कोणत्याही घटका अंतर्गत सर्वे नंबर साठी योजनेचा लाभ घेतला असेल तर पुढील १० वर्ष या सर्वे नंबर वर पुनः लाभ घेता येणार नाही
- सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधीने तयार केली असावी.
योजनेस मिळणारे अनुदान
पिकांच्या झाडाच्या मुळाशी नळी द्वारे थेंब थेंब पानी आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन या पद्धतीने पिकाला पानी दिले असतं पीक जोमदार येऊन उत्पन्नात वाढ होते.
- या योजने अंतर्गत केंद्र शासन मार्गदर्शक सूचनांनुसार सदर योजने अंतर्गत लाभार्थ्याला अनुदान खालील प्रमाणात देण्यात येते.
अनुदान
१)अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी ५५ टक्के
२) इतर शेतकरी ४५ टक्के