ठिबक सिंचन योजना २०२३
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण(pocra) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत ठिबक सिंचन योजने विषयी माहिती पाहणार आहोत. ठिबक सिंचन योजणेचे उदिष्ट काय, लाभार्थी निवड कशी केली जाते,अनुदान किती मिळणार, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात , अर्ज कोठे करायचा या सर्व घटकांची माहिती पाहणार आहे.
नानाजी देशमुख संजीवनी ठिबक सिंचन योजना
मित्रांनो हवामान बदलांमुळे कोरडवाहू शेतीवर परिणाम दिसून आहे. येणाऱ्या भविष्यात देखील हवामान बदलतच राहील याला उपाय म्हणून राज्य सरकार हवामान बदलाविषयी आराखडा तयार करीत आहे.या प्रतिकूल परिस्थितीत अल्पभूधारक तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने केंद्र सरकारने सन २०१७ -१८ मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना लागू केली तसेच राज्य शासनाने सन २०१८-१९ या वर्षात सूक्ष्म सिंचन योजना मार्गदर्शक सूचना राज्यातील कृषि खात्याला देण्यात आली आहे व नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबवली जात असल्याने अल्प भूधारक तसेच कोरडवाहू शेतकऱ्याला याचा फायदा घेऊन देरडोई उत्पादनात वाढ करता येईल.
नानाजी देशमुख संजीवनी ठिबक योजनेचे उदिष्ट
1)प्रकल्पाअंतर्गत राज्यातील अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्रात वाढ करणे.
2)आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून कृषि उत्पादनात वाढ करणे.
3)कृषि उत्पादनाची गुणवत्ता सुधारून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे तसेच कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे.
लाभार्थी निवडीचे निकष व अनुदान
निकष :१)नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प योजने अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अत्यल्प व अल्पभूधारक, अनुसूचित जाती/जमाती ,महिला ,दिव्यांग,शेतकरी यांना क्रमांकानुसार प्राथमिकता देण्यात येणार आहे. २)कोरडवाहू सेतीस शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी उपलब्ध सिंचन स्त्रोतातील पाण्याचा विचार करून सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यात येईल.ज्या पिका करिता संच बसवण्यात येणार आहे त्या पिकाची नोंद सातबाऱ्यात असणे आवश्यक आहे.
अनुदान : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत देण्यात येणारी निधी निर्धारित केलेल्या आर्थिक मापदंडा नुसार अनुसूचित जाती/जमाती, अत्यल्प व अल्प भूधारक लाभार्थ्याला ७० टक्के अनुदान लाभणार आहे.
योजने साठी लागणारे कागद पत्र व अर्ज भरणा
१)जल व माती तपासणी अहवाल
२)प्रतिनिधीने तयार केलेले सूक्ष्म सिंचन अराखडा
३)विक्रेते किंवा वितरक यांच्याकडील बिलाची मूळ प्रत असणे आवश्यक आहे.
४)सदर योजणेस लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.inया संकेत स्थळावर अर्ज भरून अवश्यक कागदपत्रे अपलोड करून लाभ घ्यावा.