गीर गाय भारतीय वंशातील सर्वात जुनी गोवंश आहे. समशीतोष्ण कटिबंधात देखील गाय खूप कठोर सहनशील एखाद्या लहान लेकराला हाक मारलं तर लेकरा प्रमाणे जवळ येते एवढी शांत ही गाय खास करून उत्तर भारतात गुजरात, राजस्थान, हरियाणा, गायीचे पालन पोषण सर्वात जास्त केले जाते. देशातील या गायीचे गुजरात मधील गीर वन भावनगर, जुनागढ, व राजकोट हे उगमस्थान मानण्यात आले आहे. तर प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते खास करून गुजरात मद्ये काठियावाडी, राजस्थान मद्ये भोदाली ,अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाऊ लागले आहे. या गायी उंच लाल कलर शरीराने सदृढ, मोठाले कान, गोल मानेचा भाग,असे लाभलेले शरीर इतर दुसऱ्या गायीच्या जातीपेक्षा या गायीचे स्वरूप आकाराने विलक्षण दिसू लागते.
असे धन-धाकट शरीर प्राप्त झाले असल्याने विदेशातही गीर प्रजातीचे गुरे खूप लोकप्रिय होऊ लागले आहेत. अमेरिका, ब्राझील, साऊथ आफ्रिका, मेक्सिको या देशाने या गायी आयात करून यशस्वी सांभाळ केला आहे.
गिर गाय दुध उत्पादन.
या गायी पासून मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन केले जाऊ लागले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय वंशातील पोषक वातावरण लाभल्याने गिर गायीस कोणत्याही प्रकारच्या आजाराची लागण होत नाही. रोगप्रतिकारक क्षमता व शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहिले तर दिवसाला १२ लिटर ते १५ लिटर पर्यंत देऊ शकते.
गिर गाय तूप उत्पादन.
कोणत्याही दुभत्या पशुस आहार हा मुबलक प्रमाणात दिला किंवा हिरवा चारा दैनंदिन देत राहिले तर दूध घट्ट होते ज्यामुळे तूप बनविण्यासाठी दुधाची लागणारी मात्रा कमी होऊन १५ ते १७ लिटर दुधा पासून १ किलो ते सव्वा किलो तूप उत्पादन केले जाऊ शकते.
गिर पशू रचना
- गिर पशू मधील सर्वात जास्त वजन हे फक्त गिर गाय व गिर वळू चे आहे.
- गायीचे वजन ३५० किलो ते ४०० किलो पर्यंत असते तर वळू चे वजन शरीर रचनेनुसार ५०० किलो ते ५५० किलो पर्यंत वाढ होते.
- गाय व वळू ची लांबी १.९०मी ते २ मीटर पर्यंत असते.
- उंची १.३० मी ते १.४० मीटर पर्यंत वाढ होते.
- शरीराचा रंग लाल, पांढरा रंगाचा असतो.
- शरीराच्या आकारानुसार कान मोठे व डोळ्याभोवती लोंबनारे असतात.
- गिर पशू ची शिंगे प्रामुख्याने १८० अंश कोणात वाकलेले असतात ज्यामुळे या प्रजातीस आणखी शोभा वाढवत असतात.
गिर गायीच्या दुधा पासून कोणते जीवनसत्व मिळतात
भारतीय गोवंश गिर गाय आहारात विविध वनस्पती, झाडपाला, व गवत यांचा मुख्य आहार मानला जातो ज्यामुळे प्रजनन क्षमता व्यवस्थित राहते तर रोग प्रतिकारक क्षमतेत वाढ होते. हा आहार दररोज दिल्याने गायीचे संगोपन व्यवस्थित राहते कोणत्याही प्रकारचे आजार उद्भवू शकणार नाहीत व जीवनसत्वची निर्मिती होते, प्रथिने, खनिज, कॅल्शियम, अमिनो ऍसिड, फॉस्फरस हे पदार्थ गिर गायीच्या दुधात उपलब्ध असतात. हे दूध दैनंदिन आहारामध्ये समावेश केल्यास शरीरास आवश्यक असणारे खनिजे मिळतात.
गिर गाय सांभाळण्याचे फायदे.
गिर गाय आपल्या गुणकारी लाभदायक वैशिष्ट्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे.
- गिर गाय पालन करण्यासाठी संकरित जनवरा सारखा खर्च लागत नाही. व कोणत्याही प्रकारचे आजारपण लवकर येत नाही.
- गायी पासून मिळणारे शेन, गोवरी ,गो मूत्र, याचाही मोठ्या प्रमाणात विक्री केली जाऊ शकते.
- गिर गायीचे दूध विकत घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.या दुधा पासून अनेक फायदे मिळतात.
- दुधाला भाव शहरामध्ये ८० रुपय ते १४० रुपया पर्यंत आहे.
- बाजारात गिर गायीच्या तुपाला २५०० ते ३००० भाव वाढ झाला आहे.
- गायीच्या दुधात ९६% A२ प्रथिने आढलतात.
- दूध सेवन केल्याने ५ ते ६ टक्के पर्यंत फॅट मिळते