गांडूळ खत प्रकल्प
गांडूळ खत निर्मिनती POCRA योजने अंतर्गत
नमस्कार शेतकरी बांधवानो नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजने अंतर्गत गांडूळ खताच्या योजने विषयी माहिती घेणार आहोत pocra योजने अंतर्गत तुम्ही शेंद्रिय खत निर्मिती करून शेती सोबत आर्थिक उत्पन्न मिळवू शकता. महाराष्ट्रातील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ज्याचे उत्पन्न कमी व अल्प भूधारक आहेत त्यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
नानाजी देशमुख संजीवनी योजना गावतील व्यक्तीला लाभकारक ठरणार आहे. हवामान बदलांमुळे शेतीस अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत अश्या परिस्थित शेतकऱ्यांना सक्षम बनविणे व त्यांना या स्कीम मार्फत अधिका अधिक रोजगाराच्या संधि निर्माण करणे तसेच आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे याच बरोबर शेतातील कचऱ्याला कुजवून प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ हे योग्य पद्धतीने सूक्ष्म जीवात वाढ करून गांडुळाद्वारे कुजवून उत्तम असा सेंद्रिय गांडूळ खत निर्मित करता येतो. या खताचा वापर मोठ्या प्रमाणात शेतात तसेच फळबागेला योग्य मात्रेत दिल्याने जमिनीची कस वाढतो व पिकाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढ होते व जमीन भुसभीत राहते गांडूळ खताची शिपड केल्याने शेतात उपयुक्त सूक्ष्म जीवांनुची वाढ होऊन जमीन ही कसदार बनते.
लाभार्थी निवड व उधीष्ट
१)या प्रकल्पा अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावासाठी ग्राम कृषि संजीवनी समितीने मान्यता देण्यात आलेल्या (VCRMC)अंतर्गत अनुसूचित जाती/जमाती, महिला ,अल्प भूधारक शेतकरी,दिव्यांग व शेतकरी यांची निवड करून लाभ देण्यात यावा
२) ज्या शेतकऱ्याकडे गांडूळ खत उत्पादन करण्याचे साधन आहे त्या शेतकऱ्याला या योजना लाभ करून द्यावा व यूनिट उभारन्यास जागा उपलब्ध असेल त्यास या पात्र ठरवावे.
३)ज्या शेतकऱ्याने इरत कोणत्याही घटकाचा लाभ घेतला असेल अश्या शेतकऱ्याला पुनः लाभ मिळू नये
४)नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजने द्वारे प्रकल्पा मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील अल्पभूधार शेतकऱ्यांना हवामान बदला मुळे होणाऱ्या नुकसानिस जुळवून घेण्यास सक्षम बनवणे
५)पौष्टिक अन्नधान्यात वाढ करणे
६) नैसर्गिक साधन संपतील हानी न पोहचवता योग्य वापर करून शेती माल पिकवणे
७)जमिनीची सुपीकता वाढवणे व ती दीर्घकाळ टिकेल याचा प्रयत्न करणे
या योजनेचा लाभ घेणासाठी https://dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करून अवशक कागद पत्र आपलोड करावी.