भारत सरकारने खाद्य तेलाच्या शुल्कात कपात :  सरकारने सोयाबीन तेलावरचे आयात शुल्क कमी केल्याने सोया तेलाच्या दरामध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे . देशात यंदा खाद्यतेलाच्या आयातीत  २० ते २२ टक्क्याची वाढ होऊन पण सरकारने आयात शूलकात वाढ करणे आवश्यक असताना सरकारे मागील २ दिवसामध्ये रिफाइंड तेलाच्या शुल्कात कपात केल्याने अगोदर आत्ता हे शुल्क १७.५ टक्के असे होते ते आत्ता १२.५0  टक्क्याच्या खाली आले आहे. जर सरकारने तेलावारील आयात शुल्क कमी करत असेल तर सोयाबीन सूर्यफुलाच्या तसेच तेल गळीत धान्य परवडणारे नाही व शेतकाऱ्याला हे धोरण परवडणारे नसल्याचे दिसून येत आहे.

आंतराष्ट्रीय बाजरात खाद्य तेलाच्या किमतीत घसरण :आंतराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किमती मध्ये घसरण झाल्यामुळे देशातील खाद्य तेलाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने बाहेरील देशाकडून तेल आयत करण्याचे प्रमाण वाढविल्याने याचा फटका देशातील तेल उत्पादन करणाऱ्या कंपण्याना होऊ शकतो. नोव्हेंबऱ् ते मे महिन्यात या महिन्यात पाम तेलाचे आयात करण्याचे प्रमाण हे  ५० टक्क्याने वाढले तर इतर तेलाचे प्रमाण हे २० टक्क्या वरुण २८ टक्के वाढविण्यात आले आहे सध्या आंतराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव स्वस्त झाल्याने गोडे तेलाची आयाती मध्ये वाढ झाली आहे .

महागाई कमी करण्यास सरकारचे प्रयत्न:महागाई दर हा २०२३ च्या एप्रिल महिन्यात ७.७९ टक्के होता सरकारने खनिज तेल व खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या खिशाला झळ ही सध्या स्थितीला स्थिर राहणार असल्याचे दिसत आहे. मित्रानो तुम्हाला तर माहीत च आहे की भारतीय व्यंजनामध्ये दैनंदिन वापरत तेलाचे प्रमाण मोठ्या प्रमानात वापर केला जातो जर भाजीला तेलाचा तडका तसेच विविध प्रकारचे फ्राय च्या माध्यमातून तेलाचा मोठा वापर व्यंजन बनवण्यासाठी दैनंदिन वापरत येतो