कुक्कुट पालन

राज्यात कुक्कुट पालन करणाऱ्या तरुणाईचा कल दिवसेन दिवस वाढ होत आहे.याच बरोबर शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून ही याकडे पहिले जाते. शेती व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागात कुक्कुट पाळनातून रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.पक्षी पाळणातून आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना धीर तर मिळतच आहे पण आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी नवीन स्त्रोत निर्माण झाला आहे. ज्या शेतकऱ्याची कोरडवाहू शेती असेल अश्या शेतकऱ्यांना कुकट पाळणातून आर्थिक लाभ झाल्याचे समजते पीक उत्पादन जर कमी झाले तरी शेती पूरक म्हणून स्थापन केलेला कुक्कुट पालन व्यवसाय आधार देतो आहे.

पण मागील ३ ते ४ वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती सोबत या व्यवसायास मोठे नुकसान झाले आहे. याचे मुख्य कारण असे की कोरोना महामारीच्या वेळी अनेक जण वेगवेगळ्या अफवा पसरवून कोंबडी पासून ही कोरोणा  लागण होऊ शकते. दळण वळण पूर्ण ठप्प असल्यानं, बाजारपेठ बंद अशा अनेक कारणामुळे मागणीत घट होऊन भाव ढासळत गेला. दुसर म्हणजे पक्ष्यांना सर्वात घातक मानला जाणारा बर्ड फ्ल्यू आलेला त्यामुळे अनेक  कोंबडा उद्योग बंद करावा लागला.हजारो संख्येने कोंबडी मरण पावल्याचे दिसून येते.

राज्य सरकार पशुवैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत कुक्कुट पालन व्यवसाय प्रशिक्षण ही राबिवले जाते. ज्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळते.

१) चर्चा

२) प्रशिक्षण

३)संदर्भात माहीती मिळते.

४) प्रशिक्षणामध्ये पक्षाच्या जाती

५) पक्ष्यास अनुकूल हवामान

६) आरोग्य

७) लसीकरण

८) खाद्य व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळते.

अश्या व्यवसायिक प्रशिक्षणातून पारंगत झालेला विद्यार्थी व्यवसायिक शेती सोडून इतर शहरात मोलमजुरी करण्यास पलायन करावे लागणार नाही.

पोल्ट्री शेड

कोंबडी व्यवसाय करण्यासाठी शेड असणे आवश्यक असते ज्यामुळे कोणतेही प्राणी पक्षी येऊन पिलांची नुकसान,इजा पोहचवू शकणार नाहीत ऊन वाऱ्यापासून पिलांचा बचाव होते.

    • लांबी किमान ७० ते ५० फूट तर रुंदी ३५ ते ४० फूट ठेवावे.
    • शेडची दिशा पूर्व पश्चिम असली पाहिजे.
    • बांधकाम करते वेळी जमिनीच्या खाली १ ते दीड फूट व जमिनीच्या वरती २ फूट बांधकाम असावे.
    • असे शेड निर्माण केले असता मुंगूस, बहिर ससाणा, साफ, गुस आतमध्ये प्रवेश करता येणार नाही
    • ऊन व पाऊस आत मद्ये येऊ नये म्हणून चारी बाजूने सुरक्षित करून घ्यावे.
    • अशा स्वरूपाच्या शेड मद्ये २५०० ते ३००० पक्षी समावले जातील.
खाद्य व पाणी नियोजन

कुक्कुट पालन व्यवसायात खाद्य व पाणी सर्वात महत्वाचा भाग ठरतो. खाद्य प्रणाली मद्ये ज्याने बदल करून हा व्यवसाय चालवला आहे तो एक यशस्वी उद्योजक ठरला आहे. कुक्कुट व्यवसायास खाद्य जेवढे उच्च प्रमाण राहील तेवढा पक्षाची वाढ होण्यास मदत होते. जर तुम्ही खाद्य कमी गुणवत्ता असलेले दिले तर पक्ष्याची वाढ खुंटते आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

  • साधारणतः ७० बाय ४० च्या पोल्ट्री फार्म मद्ये अडीच हजार पर्यंत पक्षी संगोपन करता येते.
  • पिलांचे खाद्य, लसीकरण पिलांचा जाती नुसार केले जाते.
  • मका, हायड्रोपोनिक सिस्टम मध्ये उत्पादन केलेल्या धान्याचा पुरवठा केला तर उत्तम दर्जाचे आहार ठरतो.
  • पक्षाला लागणारी औषधें शक्यतो पाण्यातूनच देण्यात यावी.
  • दिवसातून दोन ते तीन वेळा खाद्य दिले पाहिजे.
कोंबडा लसीकरण

जर आपण संगोपन करण्यासाठी पिल्ल आयात करून घेतलं असाल तर अश्या पिल्लांना योग्य पद्धतीने लसीकरण झाले पाहिजे. ज्यामुळे त्याचा विकास सर्वांगीण होऊन व्यवसायिकांना फायद्याचा ठरतो.

  • लासोटा
  • फौलफॉक्स
  • इंफेक्शन इन्फेक्शन ब्रोकाइटीस
  • गंभोरो

या काळात मोठ्या प्रमाणात पशुची वाढ करण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. ४ ते ५ आठवड्यात नंतर मुक्त संचार उपलब्ध  करून द्यावा याच बरोबर चांगल्या प्रकारे फीड देण्यात यावा ज्यात १६ ते १७ टक्के प्रोटीन व ५ ते ६ टक्के कॅल्शियम खनिज ची मात्रा जास्त असणारे अन्न चारा म्हणून देणे आवश्यक आहे.

कुक्कुट पालन योजना

ग्रामीण अर्थव्यवस्था प्रगती प्रथावर आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकार दुग्ध व पोल्ट्री फार्म व्यवसायाचा विकास करण्याचा हेतूने सरकारकडून ५० लाख पर्यंत दिले जाईल यात २५ लाखा पर्यंत कर्ज माफ करण्यात येईल https://nlm.udyamimitra.in/ या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करू शकता.

 

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून या विविध माध्यमाच्या माध्यमातून प्राप्त करून प्रदर्शित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्या विषयाच्या क्षेत्रातील जाणकार तज्ञांचा सल्ला घ्यावा ही माहिती सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित केली जात आहे. इतर कोणत्याही नुकसानीस लेख अथवा लेखक या वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

 

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून या विविध माध्यमाच्या माध्यमातून प्राप्त करून प्रदर्शित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्या विषयाच्या क्षेत्रातील जाणकार तज्ञांचा सल्ला घ्यावा ही माहिती सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित केली जात आहे. इतर कोणत्याही नुकसानीस लेख अथवा लेखक या वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *