भारतामध्ये उन्हाळयात सर्वाधिक कलिंगड व खरबूज या मुख्य दोन पिकाची लागवड करण्यात येते. राज्यात या पिकास मुख्य पीक म्हणून लागवड केली जाते तर काही राज्यात अंतर पीक म्हणून लागवड करण्यात येऊ लागली आहे.जसे की ऊस व कलिगड किंवा ऊस व खरबूज या पिकाची लागवड प्रामुख्याने शेतकरी करताना दिसत आहेत. या पिका पासून देशातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ ही मोठ्या प्रमाणात झाला आहे. उन्हाळ्यात सर्वांत आल्हादायक फळ म्हणून कलिंगडास महत्त्व देतात. या फळाची चव गोड, जिभेवर विरघळून जाणारा हलका स्वाद या फळाला उन्हाळयात अधिकच महत्त्व प्राप्त करून देते.
कलिंगड उगमस्थान (watermelon origin)
कलिगंड या फळाचे उगमस्थान आफ्रिकेतील वाळवंटात कलहरी या ठिकाणी उगमस्थान मानण्यात आले आहे.फळाचा रंग हिरवा पिवळसर पट्टी आकाराने गोल स्वरूपात झाला असे सांगण्यात येते.
कलिंगड लागवड करण्याच्या पद्धती.(Methods of Cultivation of. watermelon.)
उन्हाळी हंगामातील कलिंगड लागवड महाराष्ट्रात जवळपास ६०० हेक्टर वर घेण्यात येत असून खास करून पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पिकाची लागवड करण्यात येते. लागवड ही अत्यंत बारकाईने लक्ष देऊन केली जाते. कारण लागवडी नंतर रोप मरण पावणे हे एक शेती व्यवसायकासाठी नुकसानीचा ठरू शकतो म्हणून काळजी पूर्वक सरी पद्धत किंवा रुंद गादी पद्धतीने लागवड करण्यात येते ऐका ठराविक २ ते ३ मी अंतरावर लागवड केली जाते. बियाणांची लागवड करण्यासाठी अगोदर शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळून द्यावे
कलिंगड किती प्रकारच्या जाती आहेत.(How many varieties of watermelon)
- दुर्गापूर मधू
- अर्का राजहंस
- पुसा शरबती
- आर्का ज्योती
- आईस बॉक्स
- आशियाई यामाटो (जपानी)
- शुगर पॅक
- सिम्बा
- शुगर बेबी
देशातील विविध राज्यात वेगवेगळे हवामान, जमीन, असल्याने कलिंगड लागवडीचा कल मागील काही वर्षापासून वाढत चालला आहे. कलिंगडाची लागवड जानेवारीच्या दुसऱ्या ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केली पाहिजे जेणे करून हे फळ येणं उन्हाळ्यात मे महिन्यात उत्पादनास तयार होते.
कलिंगड खाण्याचे फायदे कोणते (What are the benefits of eating watermelon)
गर्मीच्या दिवसात शररीला सांभाळून ठेवणे अत्यंत महत्वाचे असते कारण उन्हाळ्यात शारीरिक शक्ती कमी होउन मानसिक तणाव वाढू लागतो याचे गंभीर परिणाम स्वरूप शरीराला सोसावे लागते किंवा आर्थिक झळ बसू शकते,गंभीर समस्या, डीहायड्रेशन , लघवी जळ जळ होणे, शरीरात आग पसरणे अश्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात म्हणून तऱ्हल पदार्थाचे सेवन करणे अत्यंत मोलाचे ठरते.
- कलिंगडमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे मोठे प्रमाण असते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
- कलिंगडमध्ये कॅरोटीनोईड चे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब, हृदयविकार झटक्याचा धोका कमी जाणवतो.
- कलिंगडमध्ये ९० टक्के पाणी असते. हे हायड्रेटेड राहण्यास मदत करते. शरीराला उष्णतेपासून वाचविण्यास मदत करते.
- कलिंगडमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे निरोगी पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
- ज्या व्यक्तींना मूत्रपिंडाचा या स्टोनची समस्या आहे, त्यांनी भरपूर कलिंगड खावे.
- कलिंगड एक गोड आणि रसाळ फळ आहे. त्यात कॅलरी कमी असते. दररोज खाण्याने शरीरास फायदा मिळतो.
कलिंगड मद्ये कोणते जीवनसत्व असतात (What vitamins are in watermelon liquors)
कलिंगड मद्ये ८० टक्के पर्यंत पाणी असते ज्यामुळे आपल्या शरीरास हायड्रेटेड किंवा पाण्याची कमकरता भासू देत नाही. हे फळ चवदार रसाचे भरपूर प्रमाण असल्याने खाण्यास गोडवा मिळू शकतो. यात अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. शरीराला मिळणारे जीवनसत्त्वे, खनिजे व अनेक पौष्टिक पदार्थ आहेत कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे आणि कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.