करडई

करडई हे पीक तेल वर्णीय असल्याने मुख्यतः सुरवातीच्या पहिल्या २० ते ३० दिवसाच्या अगोदर उगवलेल्या बियांच्या रोपट्या पासून झाडाच्या पानाची चविष्ट भाजी बनवली जाते. याच भाजीला आपण करडई भाजी असे म्हणू शकतो.
पालक आणि करडई या पानांची लांबी आकाराने व लांबीला सारखीच असते व भाजी बनल्या नंतर दिसण्यास कोणताही फरक जाणवत नाही.या पिकापासून काही ठराविक दिवसात भाजी बनवली जाते नंतर हे पीक जस जसे मोठे होत राहील तस तसे या पिकाची चव बदलत जाते.

करडई भाजी खाण्याचे फायदे.

भारतीयांच्या आहारात अनेक पालेभाज्या रोजच्या दैनंदिन आहारमध्ये वापरल्या जातात व त्यातील एक पालेभाजी म्हणजे करडई प्रत्येक राज्यात करडई पिकाची लागवड रब्बी हंगामात केली जाते.करडईचे पाने चविस थोडे करवट आणि सुगंधी असतात ज्यामुळे याची चव खाण्यास वेगळाच अनुभव होते.
  1. कोणतेही रासायनिक फवारणी केली नसावी 
  2. पाने चाविस करवट असतात.
  3. हिरव्या पानामध्ये अ जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस, या पानाच्या सेवनाने वरील सर्व घटक शरीरास मिळतात.
  4. शरीरातील वाढलेल्या चरबीची गुणवत्ता कमी करण्यासाठी भाजी व तेलाचा वापर केल्याने चरबीचे प्रमाण कमी होऊ शकते.
  5. मूळव्याध असणाऱ्या व्यक्तीस करडई भाजी खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
  6. ही एक मोसमी भाजी असून खाण्यास चविष्ट असल्याने यास सर्वाधिक पसंती दिली जाते.

करडई तेल खाण्याचे फायदे.

महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरामध्ये करडई तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या वनस्पती तेलापासून बरेच अनेक मानवी आरोग्यासाठी करडई तेलाचे आयुर्वेदिक फायदे आहेत. म्हणून करडईच्या तेलास भारतीय बाजार पेठेत मागणी आहे.
  • या तेलाचा उपयोग भारतीयांच्या आहारात व विवध प्रकारच्या आजारास ठीक करणारे गुणधर्म आढळतात.
  • संधिवात गुडघेदुखी होणाऱ्या व्यक्तीस चोळून मालिश केल्याने कमी होतो असे सांगितले जाते.
  • ज्या व्यक्तीस उच रक्तदाब,हृदयरोगाच्या व मासिक पाळीच्या समस्या आहेत अशा व्यक्तींना करडई तेल खाण्यास सांगितले जाते.
  • औषधे तयार करण्यासाठी करडईचा वापर केला जातो.
  • कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापर केला जातो
  • करडईच्या तेलात फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणात मिळते.
  • करडईच्या तेलात लिनोइक ऍसिड चे प्रमाण ६५ टक्के च्या पुढे असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *