देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. राज्यात पाण्या अभावी देशाच्या नजरा खेचून घेणारा प्रदेश ही याच राज्यात मराठवाडा या नावाने ओळखला जातो. भारत स्वातंत्र्यानंतर म्हणजेच ३९७ दिवसांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले व अखेर १७ सप्टेंबर या दिवशी हैदराबाद निजाम राजवटीचा भारतीय सैन्याकडून पराभव करण्यात आला. ज्यामुळे मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ उन्मादी,अन्यायी,जुलमी निजाम राजवटी पासून पूर्णतः स्वातंत्र्य मिळाले.
येथील जनतेनी स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्यानंतर ही गुलाम गिरीच्या वेदना शरीरावर सोसल्या आहेत. आज याच वेदना अस्मानी संकटाचा स्वरूपात पुन्हा सहन कराव्या लागत आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक कमी पाऊस पडण्याचे कारण
१) मुख्यतः मराठवाड्याची भौगोलिक रचना ही बेसाल्ट काळ्या दगडा पासून बनलेल मराठवाडा दक्षिण पठार असे संबोधले नावे देण्यात आली आहेत.
२) पठारी प्रदेश आणि जंगलाचे कमी प्रमाण व जलवायु परिवर्तनामुळे या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे.
३) सर्वप्रथम मान्सून तयार होण्याचा पॅटर्न सामान्यतः २० मे च्या सुमारास अंदमान निकोबार बेटांवर दाखल होतो. नंतर बंगालचा सागर पार करून १ जून ला केरळ मध्ये दाखल होतो.
४) केरळ मार्गे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक व पोषक हवामान असेल तर मराठवाड्यात दाखल होतो.
५) जर एल निनो या वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे मराठवाड्यात पावसाचे कमी प्रमाण अलीकडील काळात दिसून येऊ लागले आहे.
पाणी साठवणूक जलाशय प्रणाली अविकसित
- राज्यातील जलाशयाचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त पाणी साठवणूक सिंचन प्रणाली आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर विदर्भात पाणी साठवणूक क्षमता आहे
- तिसऱ्या क्रमांकावर मराठवाड्याची पाणी साठवणूक क्षमता दिसून येते
- बहुतांश धरणे ही १९७० ते १९९२ दरम्यान निर्माण केलेली आहेत. इतर डागडुजी सह नवीन कालव्यांची निर्मिती झाली नसल्याने पाणी व्यवस्थपनाबाबत कोणताही आराखडा उपलब्ध नसल्याचे दिसून येते.
शासकीय योजनांचा अभाव
मराठवाड्यातील शेती ही पुर्णतः पावसाच्या कृपेवर अवलंबून आहे. जर पाऊस पडला तरच शेतकऱ्यांना शेतीतून उत्पादन झालेला माल विकून आर्थिक लाभ मिळतो नाहीतर शेती ही सातबाऱ्यावर दिसते.
मागील काही वर्षा पासून जलवायु परिवर्तनाचे परिणाम मराठवाड्यातील शेतीवर दिसून येत आहेत. यात सर्वात मोठी समस्या ही पावसाचे अनियमित अंगमनची समस्या निर्माण झाली आहे.
- अपुऱ्या सिंचन सुविधा ज्यामुळे पाणी नियोजन करणे कठीण होते
- कालवा या केनाल सुविधा नसल्याने पाणी व्यवस्थापन महत्वाचे ठरते
- मराठवाड्यात पाणी साठवणूक क्षमता कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
- मराठवाड्यात जरी पाऊस पडला पाणी मात्र कर्नाटक मद्ये साठवणूक होते.
- शेततळे विकास करणे आवश्यक आहे.