नापीक ,वनक्षेत्र ,गायरान,गवत लावणे आणि पडीक जमिनीवर हायब्रिड गवताची लागवड करून मोठा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो.  

नमस्कार  शेतकरी बांधवानो आज आपण ज्यांच्या नावने १ गुंठा ही जमीन नाही ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.  मराठवाडा, विदर्भातील काही भाग हा सुपीक व मुरमाड जमिनीचा आसल्याने येथील शेतीस लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पण मागील काही वर्षांपासून पशुधन,पशू ,दूध व्यवसाया कडे जोडधंदा म्हणून केले जात होते. पण या क्षेत्रात शेतकऱ्यांनी केलेल्या प्रगती मुळे पशू पालन, दुग्ध व्यवसाय याच गाव खेड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय बनत चालला आहे.त्यामुळे प्रगत शहरात किंवा इतर ठिकाणी रोजगारास भटकत जाण्याची शेतकरी पुत्रांना गरज लागत नाही.शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायीकांना चाऱ्यासाठी इतर ठिकाणाहून चारा विकत घ्यावा लागणार नाही. या व्यवसायकांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा या हेतूने पशुसंवर्धन विभागातर्फे राष्ट्रीय पशुधन अंतर्गत हिरवा चार(वैरण)व खाद्य नियोजन राबिवले जात आहे. या योजने मुळे पशुपालन तसेच दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा मिळू शकतो.

वैरण आणि खाद्य उद्योजिका कृषि योजना . 

केंद्र शासनाच्या वतीने देश भर राबवली जाणारी राष्ट्रीय पशुधन अभियाना आंतर्गत वैरण आणि खाद्य उद्योजिका कृषि योजना राबवली जात आहे.पडीक जमिनीवर वन क्षेत्र नसलेल्या ठिकाणी नापीक, ,पडीक तळे जिथे जमीन आहे त्या ठिकाणी या योजने मार्फत पडीक जमिनीवर वैरण उत्पादन करणे या योजनेचे मुख उदिष्ट आहे. या योजनेला शासणातर्फे ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना पशु पालणासाठी लागणारी वैरण टंचाई लक्षात घेता वैरण पशू खाद्य योजना राबवण्यात आली आहे खेडे गावातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने गवताची लागवड करून अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजाती याच्या विषयी माहिती देऊन उच्च जातीचे बियाणे देऊन गवत लागवडिस प्रोत्साहन देणे.

वैरण योजने मुळे बेरोजगारांना संधि. 

मागील काही वर्षापासून शेतकरी पशुपालन,दुग्ध व्यवसाय हा आर्थिक जोखमीचा असल्याने महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी या व्यवसायाकडे जोखमीने पाहत असे पण अलीकडील काळात हाच व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती करून देणारा ठरल्याने शेतकरी ही या व्यवसायामुळे उन्नत जगण्याची कला शिकत जात आहे. नेहमीच शहरी भागात हिरव्या चाऱ्याची गरज भासत असल्याने परिणाम त्याचे दूध उत्पादनावर होतो.

अर्ज असा करावा.

राष्ट्रीय पशुधन अभियाना  र्वैरण व खाद्य उद्योजिका विकास योजने अंतर्गत या योजनेसाठी शेतकऱ्यांनी nlm.udyamimitra.in या संकेत स्थळावर जाऊन अर्ज सादर करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *