- अश्वगंधा शेतीतुन मिळवा सर्वाधिक उत्पन्न..
देशातील पारंपरिक पिक पद्धतीला बाजू देत शेतकरी औषधी व आर्थिक लवकर नफा कसं मिळेल व आधुनिक पद्धतीने विविध औषधी पिकाची लागवड करून शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळत आहे.
आज आपण अशाच औषधी वनस्पती विषयी लागवडीची माहिती घेणार आहोत.
राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सतत विविध योजना द्वारे शेतकऱ्यांचे पीक उत्पादन कसे वाढवता येईल याचे प्रयत्न करत आहे.
राज्यातील शेतकरी आर्थिक समृद्ध व्हावा हाच ध्येय सरकारचा असतो.औषधी गुणधर्म समृद्ध असलेल्या अश्वगंधा वनस्पतीची लागवड एक मुरमाड जमिनी मध्ये आणि कमी पाण्यात देखील वाढू शकणारी वनस्पति आहे. या वनस्पती देशातील प्रत्येक राज्यात
वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात ढोरगुंज या अश्वगंधा या नावानं ओळखले जाते.
अश्वगंधा प्राचीन परंपरे पासून ते आज पर्यन्त .
अश्वगंधा प्राचीन काळापासून भारतीय सनातन परंपरेत औषधी गुण धर्मासाठी ओळखली जाते.या वनस्पतीच्या मुळांना भारतीय आयुर्वेदात
मध्ये मूल्यवान स्थान आहे. भारतीय आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत अश्वगंधा मुळापासून बनवलेल्या भुकटी (पावडर) ही नैसर्गिक रित्या
वापरली जाणारी ईसा पूर्वी पासून ची पद्धती आजतागायत मानवाच्या व्याधीवर वापरण्यात येते.अश्वगंधा महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. कमर दुखणे असो किंवा रोग प्रतिकारक क्षमता वाढवणे असो या दोन्ही समसेला महिलांसाठी रामबाण उपाय म्हणून वापरली जाते.
अश्वगंधा वनस्पती पिकाची लागवड
अश्वगंधा वनस्पतीचे लागवड ही प्रामुख्याने खरीप हंगामात जुलै ते ऑगस्ट महिन्यात केली जाते.
- सपाट जमीन कमी पाण्याची निचरा होणाऱ्या जमिनीवर लागवड करण्यास योग्य मानली जाते. या वनस्पतीच्या लागवडीसाठी मराठवाडा व विदर्भातील जमीन लागवडी योग्य मानली जाते.
- या ठिकाणचे वातावरण हे उष्ण व समशीतोष्ण म्हणजे २० अंश ते ४० अंश असल्यामुळे या वनस्पतीचे उत्पादन हे नेहमी जास्त मिळते.
- अश्वगंधा पिकासाठी पावसाची मुबलक आवश्यकता नसल्याने अश्या वातावरणात पीक दमदार येऊ शकते.
पीक उत्पादनं जमीन कोणत्या दर्जाची पाहिजे.
- अश्वगंधा पीक उत्पादन घेण्यासाठी जमिनीचा दर्जा हा हलक्या रेताड किंवा लालसर मातीचा असला तरी या पिकाची लागवड करून योग्य प्रमाणात उत्पादन मिळू शकते.
- जमिनीचा पीएच मूल्य ६.५ ते ८ च्या दरम्यान असल्यास योग्य मानला जातो.
- अश्वगंधा रोप वाढीसाठी जमिनीत सम प्रमाणात ओलावा असन आवश्यक आहे.
- खरीप हंगामात लागवड केल्यास पुढील २ ते ३ वर्षात मुळांची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पीक कडणीस येते.
अश्वगंधा चूर्ण (पावडर)चे फायदे .
१)चूर्ण (पावडर) मुळे ब्लड शुगर आवाक्यात राहण्यास मदत होते.
२)रोजच्या जीवनात थकून जात असल्याने शारीरिक कमजोरी येते. जर या पावडर चे सेवन केल्यास ही समस्या दूर होते.
३)दुधात या वनस्पतीचे पावडर टाकून पिल्याने योवन कमजोरी व थकवा दूर होतो.