राज्यात कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक मनोबल वाढवणार कांदा
या पिकाची किंमत देशात येणाऱ्या काही दिवसात वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण यावर्षी एल निनो मूळे पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्यास न मिळणारा हमीभाव तसेच पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेऊन शेतकरी पारंपरिक पद्धतीच्या वाणाची लागवड केली असल्याने येत्या काही दिवसामध्ये कांद्याची मागणीत वाढ होइल व उत्पादनात घट झाल्यामुळे कांदा पिक हमी भावात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. या वर्षी जसा टॉमॅटो च्या भावात जुलै, ऑगस्ट महन्यापर्यंत शेतकऱ्यांना या पिकाने दिलेला परतावा राज्यात निवड होणाऱ्या लक्की ड्रा पेक्षाही मोठा आहे.
नाफेड चा कांदा बाजारात येण्यास ३ महिने कालावधी
राज्यातील बाजार पेठेत नाफेड चा कांदा ऑक्टोंबर ते नोव्हेंबर येइल तोपर्यंत शेतकऱ्यांना कांदा मार्केट मध्ये तेजीचा फायदा मिळवून देऊ शकते. पण बाजारात आवक वाढल्यास दर कमी होण्याची चिंताही शेतकऱ्यांना भासवत आहे.
मुंबई, पुणे, नाशिक कांदा दरात वाढ.
मुंबई,पुणे, नाशिक, या राज्यातील कांद्यासाठी प्रमुख बाजारपेठांमध्ये समावेश आहे.
१) मुंबई दर प्रती किंवठल १७५० ते २५०० दर मिळत आहे.
२) पुणे दर प्रती किंवठल १७५० ते २५०० दर मिळत आहे.
३) नाशिक प्रती किंवठल २२५० ते ३००० दर मिळत आहे.
मार्च पासून ते जून महिन्यापर्यंत कांद्याला अल्प दर ३०० रु प्रति किंवठल शेतकऱ्यांनी विकला होता बऱ्याच शेतकऱ्यांचा खर्च ही त्यातून मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. पण मागील १५ दिवसापासून याच पिकाची मागणी वाढल्याने दर वाढत चालले आहेत.
नाफेड कांद्याची आवक बाजारात येणार.
राज्य सरकारने नाफेड मार्फत शेतकऱ्याकडून कमी किमती मध्ये खरेदी करून साठवलेला कांदा जर बाजाराची तेजी पाहून विकत असेल तर शेतकऱ्यांच्या घरातील साठवून ठेवलेल्या कांद्याला भाव हा पूर्वी सारखाच मिळू शकतो नाफेड कांदा विषयी सोशल मीडिया मद्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
जसी टोमॅटो ची भाव तशीच कांदा भाव वाढ होणार.
जर राज्य सरकार नाफेड मार्फत साठवलेला कांदा ऑक्टोंबर पर्यंत बाजारात दाखल करत नसेल तो पर्यंत जसा टॉमॅटो ने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून दिला तसाच कांदा ही करून देऊ शकतो.