कुळ म्हणजे काय
नमस्कार मित्रांनो कृषी अड्डा या लेखात कुळ, कुळाचे प्रकार, कुळाचे हक्क कोठे असतात, कुळ कसे तयार होते हे आज आपण पाहणार आहोत.
एखाद्या शेतकऱ्यांच्या जमिनीला कुळ लागले हे आपण सर्वांनाच ७/१२ पाहत असताना माहिती असेल. कुळ लागणे या वाक्याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला माहीतच असेलच. किंवा बहुतांश जणांना माहितीही नसेल. कुळ म्हणजे एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन कायदेशीर पद्धतीने मशागत करणारा व प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या व्यक्तीला कुळ म्हटले जाते. ज्या जमिनीला कुळ लागले असेल अश्या जमिनीला भोगवाटा दार वर्ग २ च्या जमिनी असेही म्हटले जाते. अशा जमिनी इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीस विकण्यास व हस्तांतरण करण्यास शासनाच्या जाचक अटी सह निर्बंध घालण्यात आले आहेत.ज्या शेतकऱ्यांना भोगवाटा दार वर्ग २ अंतर्गत येणाऱ्या जमिनी विकण्यास कायदेशीर व सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय विकता येत नाहीत
किती प्रकारचे कुळ असते.
कुळाचे ऐकून तीन प्रकार असतात १) संरक्षित कुळ (२) कायम कुळ (३) कायदेशीर कुळ
१) संरक्षित कुळ
संरक्षित कुळ म्हणजे सन १९३९ कायद्यानुसार एखाद्या शेतकऱ्याची जमीन दुसऱ्या शेतकऱ्याने सतत ६ वर्ष जमीन कसनाऱ्या किंवा १ जानेवारी १९४५ वर्षा पूर्वी सलग ६ वर्ष जमीन कसली असेल अश्या व्यक्तीला १९४७ पर्यंत संरक्षित कुळ म्हणून ओळखले जाते. म्हणून अश्या व्यक्तीची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकारात संरक्षित कुळ नोंद करण्यात आली आहे.
२) कायम कुळ
मुंबई कुळ कायदा १९४८ कलम २(१०) अन्वये नुसार कुळ म्हणजे १९५५ साल पर्यंत जसे की कायद्या सुधारणा होण्यापर्यंत ज्या व्यक्तिंना त्यांच्या वहिवाट या न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे कायम कुळ ठरविण्यात आलेल्या अश्या जमिनीस कायम कुळ म्हणून नोंद करण्यात आली आहे.म्हणून अश्या व्यक्तीची नोंद ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकारात कायम कुळ नोंद करण्यात आली आहे.
३) कायदेशीर कुळ
१)कायदेशीर कुळ म्हणजे जो व्यक्ती इतर दुसऱ्याच्या मालकीची जमीन कुळ या नात्याने कसेत असेल.(२) कुळ कसणारा व्यक्ती जमीन कसण्याच्या मोबदल्यात जमीन मालकास नियमित जमीनीचा मोबदला या खंड देत असेल.(३) जो व्यक्ती जमीन मालकाच्या कोणत्याही व्यक्तीच्या परस्पर देखरेखेखली जमीन कसेत नसेल तर अशी व्यक्ती कायदेशीर कुळ म्हटली जाते.
कुळ हक्क
जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना कुळ संबंधी महत्वाचे मुद्ये.
- सन १९३९ या कायद्यांतर्गत दी १-१-१९३८ पूर्वी सलग ६ वर्ष जमीन कसणाऱ्या किंवा दि १-१-१९४५ पूर्वी सतत ६ वर्ष जमीन वापरणाऱ्या व्यक्तीस १-११-१९४७ साली जमीन कसणाऱ्या व्यक्तीची नोंद कुळ म्हणून करण्यात आली आहे.
- एखाद्या शेतकऱ्यांच्या जमिनीला कुळ होण्यास काही महत्वाचे अपवाद करण्यात आले आहेत.१) विधवा असेल वयस्क २) जो मनुष्य शरीराने व मनाने कमकुवत असलेला माणूस.
- कुळ या शब्दाची संकल्पना समजण्यास थोडीशी वेगळी आहे असे म्हटले तरी चालेल.१) एखाद्या शेतकऱ्याच्या मालकीची असणारी जमीन दुसरा व्यक्ती या शेतकरी कायदेशिर कसणारा असला पाहिजे.२) जमीन मालकाची किंवा कसणाऱ्याची तोंडी या कागदोपत्री व्यवहार झाला पाहिजे.३) जो व्यक्ती परंपरेने शेतीचा योग्य मोबदल्यात जमीन मालकाला योग्य प्रमाणात खंड देत असला पाहिजे.
कुळ निर्माण कसे होते.
कुळ कायद्या म्हणजे कसेल त्याची जमीन असे होते म्हणून या शब्दांना अती महत्व प्राप्त झाले आहे. कायद्याने सांगायचं झालं तर जातीने जमीन कसणे हे ही तितकेच महत्वाचे ठरते.
१) सदर व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील नसला पाहिजे.
२) कायदेशीर रित्या दुसऱ्या मालकाची जमीन कसेत असेल तर
३) जातीने कसत नसेल तर कुळ निर्माण होते
४) सदर व्यक्ती मालकाच्या कुटुंबातील नसला पाहिजे.
५) जमीन गहान घेणार नसला पाहिजे.
जातीने जमीन कसणे हे आपण सविस्तर पाहुयात
- उदा: विशाल जमीनीचा स्वतः मालक आहे. विशाल ने त्याच्या देख रेखे खाली कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जमीन देऊन मजुरांकडून काम करून घेणे होय.
- जमीन मालक यांच्या कुटुंबातील ऐका व्यक्तीने अंग मेहनतीने जमीन कसणे.
- स्वतः जमीनीचा मालक अंग मेहनतीने जमीन कसणे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून या विविध माध्यमाच्या माध्यमातून प्राप्त करून प्रदर्शित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्या विषयाच्या क्षेत्रातील जाणकार तज्ञांचा सल्ला घ्यावा ही माहिती सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित केली जात आहे. इतर कोणत्याही नुकसानीस लेख अथवा लेखक या वेबसाईट जबाबदार राहणार नाही.