कडबा कुट्टी मशीन अनुदान. 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कडबा कुट्टी विषयी माहीती घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाकडून राबिवण्यात येणाऱ्या योजनांचा मुख्य उद्धेश शेतकऱ्यांना शेती विषयक अवजारे कमी किमती मध्ये उपलब्ध व्हावे तसेच जमिनीची मशागतिचे नियोजन योग्य पद्धतीने होऊन शेतकऱ्यांस अधिक उत्पादन कसे घेता येईल हे राज्य ठरवीत असते. हाच उद्धेश डोळ्यासमोर ठेऊन शासनमार्फत कडबा कुट्टी अनुदान योजना स्कीम मार्फत शासन राबवत आहे.या यंत्राची किमत १० हजार पासून ते ४० हजार पर्यन्त आहे. जर हे यंत्र ३ एचपी व ५ एचपी असेल तर तुम्ही ज्या एचपी चे यंत्र घेणार असाल त्या यंत्राची किमत ठरविले जाते.

कडबा कुट्टी नियोजन.  (दूध उत्पादनात वाढ) 

ज्या शेतकऱ्यांकडे म्हैस,गाय,शेळी,दूध देणारी पशू असतील त्यांना चारा पानी देण्याचे काम काटे कोरपणे पालन केले पाहिजे जर शेतकऱ्यांकडे जर्षी गाईच गोठा असेल त्या शेतकऱ्यांना गाईचे दूध वाढवण्यासाठी कडबा कुट्टी हे यंत्र कामी पडणार आहे. मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे मराठवाडा तसेच विदर्भातील काही भाग हा दुष्काळी परिस्थितीचा भाग मन्हून ओळखला जातो. येथील शेतकरी कायमच आर्थिक जोखीम पत्करून दूध व्यवसाय करत असतात. जर अल्प भुदारक शेतकऱ्यांना पशू पालन व्यवसाय योग्य नियोजन करायचे असेल तर राज्य शासना मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा मधून काही घटकाची योग्य निवड केली पाहीजे जसे की कडबा कुट्टी माशीनचे खूप फायदे आहेत. जनावरांसाठी चारा हा या यंत्राच्या मदतीने अती जलद गतीने व चाऱ्याची नासाडी न करता कापता येतो. हाच चारा पशू ना योग्य प्रमानात दिल्याने दूध उत्पादनात तर वाढ होईलच त्याच बरोबर चारा ही कमी लागेल.

कडबा कुट्टी पात्रता व निकष 

कडबा कुट्टी मशीन साठी अनुसूचित जाती जमाती, महिला,दिव्यांग,अल्प भुदारक शेतकऱ्यांना ५२ टक्के ते १९हजार ५०० रु पर्यन्त अनुदान मिळू शकते. इतर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम ही १६ हजार पर्यन्त आहे.

कडबा कुट्टी अर्ज व आनूदान योजनेसाठी आवश्यक पत्रावली. 

  • शेतकऱ्यांचे आधार कार्ड (Aadhar card)
  • जातीचा दाखला (Cast Certificate)
  • ८ अ चा उतारा
  • बँक पासबुक (Bank Passbook)

कडबा कुट्टी मशीन अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार तर शेतकरी मित्रांनो https://mahadbt.maharashtra.gov.in या दिलेल्या संकेत स्थळावर वर जाऊन  कडबा कुट्टी साठी अर्ज करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *